जाग धनगरा जाग …
जाग धनगरा जाग, नवी पहाट झाली आज,
घालावती झोपेत, आयुष्याची वर्षे हजार,
धनगर समाजात आली, नव्या क्रांतीची मशाल,
शिक्षणात झाली आता, न्या उत्साहाची लाट,
तुझ्या पाठीशी आहे अहिल्या देवी संघटनेची ढाल,उसळू दे धनगर महासागरात, वादळ वाट,
भटका मेंढपाळ धनगराला, देवू सहारा आज,
या जीवनात पाहू, विकासाची सुवर्ण पहाट,
प्रस्थापित दलालांना, देऊ हिसका आज,
भ्रष्टा दलालीचा मोडू कणका आज,
एकेका दलालाची, लावू आज वाट,
वैभवशाली धनगराचा, पाडू नका,
तोडू नका डोलारा आज,
दमडीच्या दलाला विकू नका, धनगराला आज,
करु वैभवी इतिहास, नवा डोलारा आज,
धनगर नाही कुणाचा, गुलाम आज,
शिका, संघर्ष करा, अहिल्या प्रतिष्ठानाची हाक
जबाब द्यावा लागेल, दलालांना ज्यांनी,
धनगराला केले बरबाद,
नष्ट करा, राजकीय दलालांचा थाट-माट,
आज चालवा, धनगर समाजाच्या विकासाचा
आवाज निर्माण करा, भावी धनगर पिढय़ांचा नव इतिहास
चला नव्या तेजाच्या प्रगतीच्या मार्गावर आज,
घेऊन पुण्यश्लोक अहिल्या देवी सेवा संघाची साथ…
जाग धनगरा … जाग धनगरा …
सौजन्य : सौ. मिराताई महादेव अर्जुन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत