अहिल्या संदेश

अहिल्या संदेश : स्वतंत्र्याच्या 60 वर्षात महाराष्ट्रात धनगराची घोर फसवणूक आदिवासी (S.T.) समावेश असूनही अंमलबजावणी नाही
धनगर आदिवासी कसा? धनगर समाज हाच या देशातील आदिम आदिवासी समाज आहे. सह्याद्री, सातपुडय़ाच्या रांगा सर्व गडकोट किल्ले भ्रमंती करताना प्रथम जंगलवासी आजही भेटतो तो आदिम आदिवासी धनगर. छत्रपती शाहू राजांना त्यांच्यावर झालेल्या वाघाच्या हल्यांतजंगलामध्ये एका धनगराने त्यांना वाचविले आहे.
खंडाळा घाटातील रस्ता शिंगरोबा नावाच्या धनगर मेंढपाळानेच इंग्रजांना दाखवला आहे. आजही रायगडावर डोंगरकपारीत धनगर समाजाचेच लोक भेटतात. महाबळेश्वरातील दहा हजार लोकसंख्येपैकी अडीच हजार लोकसंख्या धनगर समाजाची आहे. हजारो वर्षे नागरी जीवनापासून दूर दऱयाखोऱयात माळावरती धनगर समाज आपला उदरनिर्वाह करत राहीला आहे. पूर्वी सर्वत्र असलेल्या जंगलतील गवत व झाडांचा पालाच केवळ मेंढय़ांच्या चरण्यासाठी तो घेत आला आहे. पण स्वार्थी शहरी, नागरी लोकांनी औद्योगिकरणाच्या नावाखाली जळाऊ लाकडासाठी संपूर्ण जंगलेच संपवून टाकली. त्यामुळे उघडय़ा बोडक्या कवठेमहांकाळ, माळशिरस सारखे माळरान भाग आज समाजाच्या नशिबाला आले आहेत. धनगरांच आदिवासी जीवन अशा रितीने प्रगत समाजाने हिसकावून घेतले आहे. 
     धनगर हे भकास गावचे देशमुख, पाटील म्हणवून घेत असले तरीही होळकरांसारखी विकासाची संधी काही मोजक्याच लोकांना लाभली आहे. आदिवासी म्हटलं की सामुदायिक नृत्य हे आलंच, आदिवासी धनगराचं गजनृत्य आता सातासमुद्रापार लंडन मध्येही गौरवल जाऊ लागल आहे. जंगली जनावरांपासून आपल्या मेंढयांच मोठा आवाजामुळे रक्षण व्हाव म्हणून गळयात घेतलेला धनगरी ढोल धनगरी ओव्यांच्या निमित्ताने आजही सर्वत्र वाजतोय अशा रीतीने धनगराचे आदिवासीपण सिद्ध होते. मेंढपाळीसाठी सततच्या जंगलातील भटकंती मुळे दलीत समाजासारखे सांगायला स्वत:चे गावही नाही मतदार यादीत नावं नाही, रेशनचे कार्ड नाही, स्वतंत्र भारताच्या नागरिकत्वाचा कोणताच पुरावा कालपरवा पर्यंत नसलेने भारताचे स्वातंत्र्य धनगराच्या वाटय़ाला कधीच आले नाही. धनगरांचा स्वभाव लाजरा बुजरा असल्याने ते अन्य समाजात मिसळत नाहीत. त्याला शासकीय योजना, सुविधांचा लाभ लागला नाही. भटक्या आदिवासीमागे भटक्या शाळा नसल्याने अशिक्षित पणा धनगर समाजाच्या पाचविलाच पुजला आहे. ।। उधळाया भंडारा जागा हो धनगरा।।

विकासामुळे धनगर विस्थापित अन्यायग्रस्त:- फॉरेस्टच्या कायद्यामुळे मेंढपाळांना त्यांच्या हजारोवर्षाच्या जागेतून हाकलून दिले जात आहे. राज्यातील बहुतेक धरणेही धनगरांच्या जमिंनीवरच उभारली आहेत. चराऊ कुरण, माळरान धनदांडग्याराजकर्त्याकडून महाराष्ट्रभर फसवून, व्यसनात अडकवून अल्प मोबदल्यात आपल्याकडून विकत घेतली जात आहेत. मेंढपाळी व्यवसायातून बाहेर पडलेला धनगर बांधव शहरामध्ये पहिल्यांदाच आसऱयाला आला आहे त्याला नागरी जीवनातील रिती रिवाज, चालीरीती माहीत नसल्यामुळे त्याची अडचणी धनगर अशी हेटाळणी नागरी समाजाकडून होताना दिसते. आज मेंढपाळीतून असे आठ ते दहा हजार मेंढके, हमाल म्हणून केवळ सांगली शहरातील झोपडपट्टीत जीवन जगत आहेत. आई वडील आडाणी झोपडपट्टीत शिक्षणाचे वातावरण नाही त्यामुळे त्यांची मुलेही समाजाचे ओझे वाहण्याची शारीरीक कष्टाची कामे करीत आहेत. शारिरीक कष्टातून व्यसनाधिनता, दारु, नशाबाजी व त्यातून पुन्हा गरीबी अशा दुष्ट चक्रात शासनाच्या नाकर्त्या धोरणामुळे आपला समाज अडकला आहे. त्यांच्या शारिरीक बळाचा व नागरी कायद्याच्या अज्ञानाचा स्वार्थी राज्यकर्ते राज्यभर गुंडगिरी साठी वापर करताना दिसतात. राज्यांतील तुरुंगातील कैद्यांचा अभ्यास करता सरासरी 20% निरपराध धनगर बांधव तुरुंगात अडकलेले आहेत. असे दुसऱयाचे ओझे किती दिवस उचलणार.।। उधळाया भंडारा जागा हो धनगरा।।

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी) आदेश 1950 परिशिष्ठ भाग 9 या महाराष्ट्राच्या आदिवासींच्या यादीमध्ये 36 क्रमांकावर धनगर समाजाचा समावेश केलेला आहे.
स्वार्थासाठी चा मा केला प्रथम भारतीय घटना इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित झाली त्यामुळे वरी 36 क्रमांकावर धनगर या शब्दाऐवजी हिंदी व इंग्रजीमध्ये धनगड असा उल्लेख केलेला आहे भाषेतील बदलामुळे ‘र’ चा ‘ड’ झाला आहे, जसे की आपण मराठीत 5 एकर जमिन म्हणतो तर हिंदीत 5 एकड असा उल्लेख होतो. र चा ड या भाषेतील फरकाचा तत्कालीन राज्यकर्त्यानी, बुद्धी पुरस्पर व जाणिवपूर्वक महाराष्ट्रात धनगड ही नवीन जात जन्माला घातली. धनगर व धनगड हे दोन वेगवेगळे समाज आहेत अशा स्वत:च्या स्वार्थासाठी बनाव करून धनगर समाजाला अंधार कोठडीत ढकलून दिले आहे. भारतीय राज्यघटनेशी द्रोह करणाऱया महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी मात्र महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या 10% असणारा धनगर समाजाची (एस.टी.) आदीवासी असलेचा मुलभूत अधिकार जाणीवपूर्वक डावलून केंद्र सरकारच्या नियोजन मंडळाकडून आदिवासींच्या लोक संख्येच्या प्रमाणात मिळणारे हजारो कोंटीच्या विकास अनुदानाला मागील 60 वर्षात महाराष्ट्र राज्य मुकले आहे. तत्कालीन लबाड राज्यकर्तांनी आदिवासी धनगर समाजाचा विकासाचा मार्ग महाराष्ट्र रोखून धरला आहे. शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तिसगड या राज्यामध्ये अशा हजारो कोटींच्या अनुदानांचा लाभ धनगर समाजाला होतो आहे. ।। उधळाया भंडारा जागा हो धनगरा।।
 
धनगरावरच अन्याय का? –  भारतीय घटनेत आदिवासी धनगर समाजाचा समावेश असूनही अन्य राज्ये मान्य करत असून देखील महाराष्ट्रात तो नाकारणाऱया तत्त्कालीन राज्यकर्त्यांचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. आदिवासी (एस.टी.) समावेशामुळे आदिवासींची लोकसंख्या 10% वाढत असलेने दुप्पट मतदार संघ राखीव होणार होते त्यामुळे अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे अस्तित्व उध्वस्त होत असल्यामुळे का कुटील डाव धनगरांच्या जिवाशी महाराष्ट्रात खेळला गेला आहे. सध्या महाराष्ट्रात धनगर सोडून आदिवासींची 9% लोकसंख्या आहे. या प्रमाणात लोकसभेच्या 48 जागांपैकी 9% जागा म्हणजेच 4 जागा व विधान सभेच्या 288 जागांपैकी 25 जागा आदिवासी साठी आज राखिव आहेत हे मतदार संघ निश्चित करत असताना आदिवासींची जास्तीत जास्त लोकसंख्या असणारा मतदार संध प्रथम व पुढे आदिवासी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने 24 विधानसभा मतदार संघ राखिव आहेत यातील शेवटच्या विधानसभा मतदार संघात तर केवळ 9% लोकसंख्या आदिवासींची दिसते. याप्रमाणे राज्यातील लोकसंख्या 10% धनगर समाजाची लोकसंख्या 1931 च्या जणगणने नुसार असून वरील प्रमाणेंच 28 विधानसभेच्या जागा व 5 खासदारकीच्या जागा धनगर समाजाच्या आदिवासी समावेशामुळे आणखी वाढणार होत्या, तत्कालीन अनेक राज्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त होणार होते या भितीने धनगर व धनगड हे दोन समाज महाराष्ट्रात वेगवेगळे आहे असे केंद्र सरकारास मुद्दाम कळविले गेले आहे.
।। उधळाया भंडारा जागा हो धनगरा।।

वस्तूस्थिती काय?- वास्तविक 1931 सालापर्यंत जातीनिहाय जनगणना झाल्या त्या जनगणनेत धनगड नावाची कोणतीही जात महाराष्ट्रात आढळलेली नाही. 1950 चा अनुसुचित जमाती कायदा करताना 1931 च्या जनगणेचा आधार घेतलेला आहे. फ950 साली अशी जात निहाय जनगणना झालेली नाही. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी हिंदी भाषिक प्रदेशातून नागपूर भागात आलेल्या काही धनगर समाजातील लोकांना धनगड जातीचे प्रमाणपत्र देऊन एक खोटी जात आपल्या स्वार्थासाठी निर्माण केली आहे. ते केंद्राच्या धनगड यादीमध्ये आहेत असे राज्यसरकारने कळवून वस्तूस्थिती दडविली आहे.
।। उधळाया भंडारा जागा हो धनगरा।।

झालेले नुकसान धनगरांचया आदिवासी जमातीत समावेश नाकारून राजकीय आरक्षण नाकारले तसेच लोकसंख्येच्या प्रमाणातील हजारो कोटीचे अनुदान बुडवले, शिक्षणातील स्कॉलशिप बुडवल्या, शासकीय सेवेतील नोकऱया नाकारल्या, आदिवासींची जमिन ही जिल्हाधिकारी परवानगी शिवाय विकता येत नाही. अज्ञानी व पणाचा गैर फायदा घेऊन कमी मोबदल्यामध्ये असे व्यवहार होऊनयेत यासाठी आदिवासी जमिन विक्री नियंत्रण कायदा केला गेला आहे. स्वातंत्र्य पूर्व महाराष्ट्रात धनगर समाजाच्या मालकीची अनेक चराऊ कुरणे, डोंगर होते दरडोई धनगरांची सरासरी जमिन धारणा 10 एकर इतकी होती. मागील 60 वर्षात वरील प्रमाणे आदिवासी कायदा लागू न झाल्यामुळे अज्ञान, गरीबी व व्यसनाधिनतेचा फायदा घेऊन अशा हजारोएकर जमिनी अल्प मोबदल्यात धनगरांकडून बळकावल्या आहेत. अशा देशोधडीस लागलेल्या धनगरांकडे आता दरडोई एक एकरापेक्षा कमी जमिनधारणा राहिली आहे.

संघर्षातून जय केंद्रातील भाजप प्रणित सरकार असताना 8 जानेवारी 2003 रोजी शासन निर्णय करून बिहार, झारखंड व ओरिसा या तिन राज्यात धनगर समाजाचा समावेश (एस.टी.) आदिवासीमध्ये करण्यात यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना धनगर व धनगड एकच आहेत असा निर्णय घेणेस भाग पाडणेसाठी सध्याच्या लोकशाहीत संघटीत मतदान हे एकच अस्त्रच उपयोगी पडणार आहे. गट,तट, संघटना, उपजाती विसरुन धनगर सारा एक हा एकीकरणाचा नारा चमत्कार घडवल्या शिवाय रहाणार नाही. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. होळकरांच्यासारखी राज्यकर्ते बनवण्यासाठी आपणास शपथ ध्यावी लागेल. सर्वाना आन आहे मल्हारराव होळकरांच्या समशेरीची जिच्या दराऱयाने देशभरात अहिल्यामातेने उभी केलेली मंदिरे पुन्हा पाडण्याची कुणाची हिम्मत झाली नाही. महाराणा यशवंतराव होळकरांनी धनगर शक्तीच्या जोरावर इंग्रजांना पाणी पाजले. तेव्हा काही ठिकाणी निवडून येऊ शकत नसलो तरी पाडूतरी शकतो याची जळजळीत जाणीव खानापूर, आटपाडी प्रमाणे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना करून द्यावी लागले. संघटीत पणाहाच कलीयुगातला देव आहे. संघटीत असेल तर घेतलेले कर्ज देखील माफ होतयं हे आपण पाहतोय, हमाल, शेतकरी, कामगार, नोकरदार, व्यापारी संघटनेच्या बळावर त्यांना हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेत आहेत. आदिवासींची मागणी महाराष्ट्रात मंजूर करुन घेणेसाठी “धनगर सारा एक” हा मंत्र जपूया.
उठ धनगरा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो!  – विजय ग. गावडे / 7588167033

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.