महाराजा यशवंतराव होळकर चरित्रग्रंथ व धनगर अस्मिता विशेषांक प्रकाशन…

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर या संजय सोनवणी लिखित चरित्रग्रंथाचे महाराष्ट्राची सांसकृतिक राजधानी पुणे येथे प्रकाशन…
भारताच्या एका उपेक्षित महानायकाला इतिहासाच्या ढिगा-यातून उकरुन काढण्याचे मोठे काम संजय सोनवणी या लेखकाने केले. धनगर समाजात जन्मलेले व भारतभूसाठी उभं आयूष्य पणाला लावणारे आध्य क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी करणारे महानायक म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय.
महाराजा यशवंतराव होळकर यांचेवर संजय सोनवणी लिखित भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा दि. 13 नोव्हे 2011 रोजी नवी पेठ, पुणे येथील प्रत्रकार भवनात मोठ्या थाटामाटात पार पडला. पाक्षिक धनगर अस्मिता पारिवारा’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी पाक्षिक धनगर अस्मिताच्या महाराजा यशवंतराव होळकर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून (धनगर-बहुजन) राष्ट्रीय समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. काळाच्या ओघात गाडून टाकलेल्या आपल्या महानायकाच्या इतिहासाला समोर आणल्या बद्दल मा. सोनवणी यांचेवर अक्षरश: उपस्थितांनी स्तूतीसुमनांचा वर्षाव केला, मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली. मंचकावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेवजी जानकर, बहुजन समाजाचे थोर विचारवंत मा. हरी नरके, धनगर समाजाचे ज्येष्ट विचारवंत / समाजसेवी मा. के एल खाडे, प्रा. सुधाकर जाधवर, कार्यक्रमाचे आयोजक तथा पाक्षिक धनगर अस्मिताचे मुख्य संपादक श्री प्रकाश खाडे, ऑल इंडीया रिझर्व बॅंक ओबीसी एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष श्री एस एल अक्कीसागर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्तावना प्राचार्य सोमनाथ नजन यांनी केले. या कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र काळे यांनी केले.

होळकरी पगडी आणि खांद्यावर घोंगडे घालुन सोनवणी यांचा सत्कार आयोजकांतर्फे महाराजा यशवंतराव होळकर चरित्रग्रंथ लेखक संजय सोनवणी यांचा सत्कार. डोक्यावर होळकरी पगडी आणी खांद्यावर घोंगडे चढवुन करण्यात आला. आयोजकांनी ही पुणेरी पगडी नसून होळकरी पगडी असल्याचे माईक वरुन सांगितले. मागच्या दोनशे वर्षात प्रथमच पुण्यात सत्काराचा मान मा. सोनवणी पटकवीला असेही म्हंटले जात आहे. या सत्कार सोहळ्याला चरित्रग्रंथ लेखक सोनवणी यांची पत्नी सौ. पुष्पाताई सोनवणी, कन्या सोनल, पुत्र अनिकेत उपस्थित होते. ग्रंथ लेखक सोनवणी यांनी या वेळी सातवाहन या धनगर शासकाचा तसेच पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे मुळ दाखविणार्या पौंड्र आणि औंड्र यांचा इतिहास उलगडला. महाराजा यशवंतराव होळकर यांचे चरित्रग्रंथ लिहिताना भारावुन गेल्याचे सांगुन आलेल्या अडचणीवर कशी मात केली, हे विशद केले. मा. जानकर तसेच सचिन शेंडगे, प्रकाश पोळ, सनी ए. आदी तरुण वर्गाची साथ मिळाल्याबद्दल लेखकाने त्यांचे खास आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.