मनपाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीकडून अटक
मुंबई, दि. ०७ ऑक्टोबर, २०२०: घर दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेतली नसल्याचे सांगत २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.
सुभाष राऊत ( ५४) आणि बस्वानी नाऊकुडकर ( ५२ ) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. हे दोन्ही अधिकारी महानगरपालिकेच्या दादर जी नॉर्थ वॉर्डशी संबंधित आहेत. यातील तक्रारदार हे त्यांच्या घराची दुरुस्ती करीत असताना यातील लाचखोर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे घर दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी नसल्याचे सांगत २५ हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने २० हजार रुपये देण्याचे मान्य केले. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने सापळा लावून दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत