कामा पुरता मामा, ताका पुरती आजीबाई आणि खुर्ची पुरत धनगर आरक्षण

 धनगर आरक्षणावर आपण नंतर बोलू. आधी मराठा आरक्षण बघू. मराठा बांधवांनी तीव्र आंदोलन करून केवळ तीन चार वर्षात जे आरक्षण मिळवून घेतले त्याचा नीट अभ्यास करा. आज हे आरक्षण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल आहे तो भाग वेगळा, पण या लढाईचा संपूर्ण इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते. हा आरक्षण लढा अशा सामान्य मराठा लोकांनी जिंकला. त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. काहींनी या आंदोलनाचा गैरफायदा घेत राजकारणात शिरण्याचा प्रयत्न केला ते कायमचे संपले. आंदोलन मात्र पूर्ण पणे सामान्य लोकांच्या हातात राहिले. लढाई त्या सामान्य लोकांनीच सुरू केली आणि जिंकलेही तेच. या लढ्यात एक तरुण शहीद झाला, म्हणजे जाती बद्दल किती प्रेम आहे ते बघा.

तिकडे त्यांच्या एका तरुणांनी समाज आरक्षणासाठी जीव दिला. इकडे धनगरातील तीन तरुणांनी जीव दिला. परिणाम तिकडे विजय इकडे पराजय. तिकडे एका शहीद तरुणांच्या कुटुंबियांना सरकारने जी नुकसान भरपाई दिली, त्याच्या पाव टक्का ही या तीन धनगरांना मिळालं नाही? हे आहे तुमचं दुबळेपण. आपण या तीनही शहिद तरुणांना विसरून गेलो ही आहे आपल्यातील कृतघ्नता. कसं यश मिळेल आपल्याला, का झालं असं?
त्यांच्यात लढणार नेतृत्व आरक्षणासाठी लढत होते आणि आपलं नेतृत्व स्वतःच्या खुर्चीसाठी लढत होते. त्यांच्या नेत्यांत बाहेरून समाजहित आणि आतूनही समाजहितच होत. आपल्याकडे बाहेरून समाजहित आणि आतून स्वहित असा प्रकार होता म्हणजे आतमदी कीर्तन वरून तमाशा?

महाराष्ट्रात सर्वात मोठे नेते मराठेच होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदचंद्रजी पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि असेच अनेक नेते सत्तेवर होते. सत्ता नव्हे महाराष्ट्राचे मालकच हे नेते होते. तरी त्यांनी समाजहित पाहिलं नाही. मराठा आरक्षण यांनी कधीच मान्य केलं नाही. मराठा समाज गरीब होत गेला. या गरीब लोकांनी विद्रोह केला. त्यातून क्रांती झाली. सरकारला आरक्षण द्यायला भाग पाडलं. 


या जनशक्तीचा फायदा उठवायला सत्ताधारी मराठा नेते धावले. त्यांना आंदोलकांनी स्टेजच्या खाली पिटाळुन लावलं. मोर्च्यात या सत्ताधाऱ्याना शेवटच्या रांगेत उभे केले. मराठा आरक्षण लढ्यातील एक नेते छ संभाजी महाराज एवढे एकच आणि तेही आताच खासदार होऊन भाजपमध्ये गेले. पण ते पूर्वी कोणत्याही पक्षात नव्हते. स्वतंत्र मुक्त राहून त्यांनी मराठा आरक्षण लढा दिला. ते खासदार झाले तरी त्यांनी जातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. आजही त्यांची बांधिलकी जातीशी आहे. पक्षासोबत नाही. उदयनराजे भोसलेंनीही नुकतीच घोषणा केली की, मराठा आरक्षण लागू झालं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन. हे आपल्याकडे का घडत नाही? यासाठी लागणार शहाणपण आपल्यात नाही. आपण प्रामाणिकपणा आणि बुद्धीवादी लोकांना थारा देत नाही. तेवढा पोक्तपणा आपल्यात अजूनही नाही. आपण सत्ताधारी आणि श्रीमंत नेत्यांना प्राधान्य देतो. यात आपण निरागस असतो असं नाही. या निरागस पणातही एक स्वार्थ लपलेला असतो याला लोक धनगरी याड म्हणतात. 

हे स्वार्थी धनगरी याड लढा यशस्वी होऊ देत नाही. नेते स्वार्थी तर वागतातच पण त्यांनाही जात डोक्यावर घेते. त्यांना वाटत हा सत्तेत आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे. याचा आपल्याला नक्की फायदा उपटता येईल. नेत्याकडे अफाट पैसा आहे त्यातील पैसा अडीअडचणीत तो आपल्याला देईल. पण हा नुसता भ्रम आहे. ते लोक तुम्हाला एक दिडही देणार नाहीत हे लिहून घ्या. सत्तेत ग्रामपंचायत सदस्यत्वही मिळू देणार नाहीत. ज्यां धनगरांना सत्तेत काही तुटपुंजी पद मिळाली ती धनगर नसलेल्या नेत्यांनी दिली आहेत. एक धनगर दुसऱ्या धनगरांला कधीच मोठा होऊ देत नाही. त्याला भीती वाटते. याला मोठं केलं तर हा माझं पद घेऊन जाईल. जास्तीत जास्त दाल तडका आणि तंदुरी रोटी देतात.


या तंदुरी छाप कार्यकर्त्याना पुढारीसोबत घेतात. आरक्षणाची हाळी देतात. गर्दी जमवतात आणि ही गर्दी विकून किरकोळ पद घेतात. हे थांबलं पाहिजे. खूपच स्वस्तात ही गर्दी विकली जाते. केवळ काही पैसे, MLC, मंत्रिपद, महामंडळ अशा किरकोळ किमतीत अमूल्य गर्दी विकली जाते. अरे किती वेळा तीच तीच फसवणूक करून घेणार. गेली ७० वर्षें हाच खेळ सुरू आहे. कोणी अंडी खातो तर कोणी कोंबडीच कापून खातो. धनगरांनी सत्तेत जाण्याला कोणाचा विरोध नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात धनगर सत्तेत गेलेच पाहिजेत. एका वेळी १० खासदार, ६० आमदार, ७ पेक्षा जास्त मंत्री पद आपल्या वाट्याची आहेत, ती मिळवाच. पण ती लढून मिळवा. जात आणि जातीच आरक्षण विकून किरकोळ पद घेऊ नका. ७० वर्षें हा खेळ सुरू आहे. तुम्ही सतत नागवले जात आहात. अजून किती वर्षे बाजारात गुलाम म्हणून स्वतःला विकत रहाणार?

आरक्षणासाठी लढा तर उभा करावाच लागेल. पण खुर्च्या हरवलेल्या स्वार्थी बाजारू पुढ्याऱ्याच्या खुर्च्यां परत मिळवण्यासाठी नको. मतलबी नेत्यासोबत नाही तर, सामूहिक नेतृत्व उभं करून आंदोलन उभं करा. यात माधव गडदे यांच्या नेतृत्त्वात खालील यशवंत सेनेसारख्या निःस्वार्थी आणि अ-राजकीय संघटनेसोबत लढा उभारता आला तर नक्कीच उभारा.

हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे अस करू नका. परिणाम ठरला आहे. तुमची शिकार अटळ आहे.
धनगरको धनगरनेही लुटा, गैरोमे इतना दम कहा, जहा हमारी किश्ती डुबी वहा पानी कम था।

बापू हटकर

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.