राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी खारघर शहर वतीने माथाडी कामगारांचे दैवत स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं विनम्र अभिवादन!
खारघर, दि. २५ सप्टेंबर, २०२०: माथाडी कामगारांचे दैवत, माथाडी चळवळीचे संस्थापक, माथाडी कामगार कायद्याचे जनक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी खारघर शहर यांच्या वतीने नवनिवार्चित खारघर शहर अध्यक्ष सुरेशभाऊ रांजवण खारघर शहर कार्यअध्यक्ष प्रदीप पाटील , अॅड संतोष खोपडे खारघर प्रभारी व पनवेल जिल्हा सहसचिव कृष्णा मर्ढेकर यांनी प्रतिमेस हार घालुन विनम्र अभिवादन केले. यावेळी खारघर शहर अध्यक्ष सुरेशभाऊ रांजवण संबोधित करताना माथाडी कामगारांची एकजूट कायम ठेवणं, माथाडींच्या हक्काची लढाई लढत राहणं, माथाडींना न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या जीवनात सुधारणा घडवणं, हीच स्वर्गीय आण्णासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे, अशा शब्दात जीवनपट उलघडला आणि स्वर्गीय आण्णासाहेबांचे स्मरण भाऊसाहेब लंबडे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पनवेल जेष्ठ नागरिक जिल्हा अध्यक्ष म्हणाले की आण्णासाहेबांनी या राज्यातल्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कांची लढाई लढली. माथाडींना संघटीत करुन त्यांच्या श्रमाला मोल आणि समाजात सन्मान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं आण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनला तसेच माथाडींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांना बळ देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत