राजकीय नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली धनगर आरक्षण लढ्याची अखेर कधीच संपणार नाही, तेव्हा सामाजिक संघटनांनी सामुहिकपणे हा लढावा !
मराठा समाजातील सामाजिक संघटना सतत आक्रमक राहून आंदोलन करत असतात त्याचा परिणाम सरकार घाबरुन निर्णय घेते, माञ त्यांचा निर्णय झाला की धनगर प्रतिक्रिया वादी बनून आमचे काय विचारतो....! म्हणजे ना मशागत ..ना पेरणी ..मग उगेल कसे?? तेव्हा सोशल मिडियात सुशिक्षित धनगर पुढे येऊन घरी बसल्या बसल्या आरक्षणाची हौस पुर्ण करण्यासाठी त्यांची चळवळी करण्याची ईच्छाशक्ती नसताना किंवा सोशलमिडियावर राञराञ जागून प्रतिक्रिया देणे यालाच चळवळ, आंदोलन असा गैरसमज करुन राजकीय नेत्यांवर टिका सुरु करतात......!
तेव्हा मराठा समाजाचा लढा व धनगर समाजाचा लढा यातील मुलभुत फरक हाच आहे ते समाजातील व्यक्तिंंना दोष न देता पक्षांना देतात व त्यामुळे गटतट पडत नाहीत. त्यांनी राजकीय नेत्यांना पुढे केले नसल्यामुळे सामाजिक संघटनांनी आंदोलन चालवले त्यामुळे ते यशस्वी झाले. आपल्या समाजात बारामतीचा लढा हा एकमेव उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर ज्यांनी आयुष्यात कधीच चौंढी पाहीली नव्हती. ना कधीच आरक्षण मोर्चाला हजर राहीले नव्हते असे सुशिक्षित जमीनीवरचा लढा लढण्यापेक्षा सोशल मिडियाचा लढा लढत आहेत . त्यांना अजूनही आंदोलन व मेळावा यातील फरक कळला नाही. समाजाचा मेळावा हा नेता बनण्यासाठी घेतला जातो व आंदोलन हे समाज स्वंयस्फुर्तीने रस्त्यावर अन्याया विरोधात उतरतो. या जगात आंदोलनानेच क्रांती होती तर मेळाव्याने समाज विशिष्ट व्यवस्थेचा गुलाम बनतो. बारामतीच्या आंदोलनाने सुशिक्षितांना सामाजिक कामाकडे आकृष्ट केले.
सामाजिक संघटनांमुळे सामाजिक चळवळ उभी राहते. सामाजिक चळवळ उभी राहिली की जनमत तयार होते. जनमत तयार झाले की राजकीय चळवळीत रुपांतर होते.
बी.के. कोकरेसाहेब यांच्या सामाजिक चळवळीचा अभ्यास होणे आवश्यक आहे. सामाजिक चळवळ ही अखंड पणे समाज प्रबोधन करत राहते.
राज्यसभा वा विधानपरिषद कधीही भंग होत नाही तसे सामाजिक चळवळ ही कधीही भंग होता कामा नये. विचारधारा ही आपोआपच निर्माण होत जाते.
बुद्धीवाद्यांनी हे काम हाती घ्यावे. तेव्हा महादेव जानकर यांनी ते अध्यक्ष असलेल्या यशवंत सेना या सामाजिक चळवळीचे रुपांतर राजकीय पक्षात केल्यामुळे त्या संघटनेचे काम थांबवले तेव्हा त्यांना सामाजिक नेता म्हनून न पाहता बहुजन समाजातील स्वतः चा पक्ष असलेला राजकीय नेता म्हनूनच पहावे म्हणजे गैरसमज निर्माण होणार नाही.
मोहनराव जानकर पैठण,
जि. औरंगाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत