खडकी येथील सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे भव्य स्मारक बांधावे आणि होळकर उड्डाण पुलाचा नामविस्तार करण्यासाठी पुण्याचे महापौर आणि आयुक्त यांना महाराष्ट्र यशवंत सेनेचे निवेदन
खडकी येथील सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या छत्रीचा विकास करून भव्य स्मारक बांधांवे आणि होळकर उड्डाणपुलाचा नामविस्तार करून सुभेदार तुकोजीराव होळकर उड्डाणपूल असे नामकरण करावे यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आणि पालिका आयुक्तांना महाराष्ट्र यशवंत सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख बीरू कोळेकर, युवा नेते सागर शिंनगारे आणि यशवंत सैनिकांनी निवेदनाद्वारे केली मागणी
पुणे, दि. १२ ऑगस्ट, २०२०: १५ ऑगस्ट- श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर (Subhedar Tukojirao Holkar) (प्रथम) [२५ जुलै, १७२५ - १५ ऑगस्ट, १७९७] यांचा स्मृतिदिन. मराठी साम्राज्याच्या जडण-घडणीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या महायोध्यांमध्ये त्यांचे स्थान अढळ आहे. पेशावर ते गजेंद्रगड (कर्नाटक Karnatak) या साधारण २८०० किलोमीटरच्या परिसरातील अनेक मराठी लष्करी मोहिमा तुकोजीरावांच्या मुत्सद्दीगिरीचा, नेतृत्वगुणाचा जयजयकार करतात यात शंका नाही.
टिपू सुलतानचा (Tipu Sultan) गजेंद्रगड (कर्नाटक) येथे जून १७८६ मध्ये तुकोजीरावांच्या नेतृत्वाखालील फौजांनी केलेला पराभव त्यांचे युद्धकौशल्य अधोरेखित करतो. तुकोजीराव हे सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे सख्खे चुलत पुतणे होत, मल्हाररावांच्या कारकिर्दीत अनेक युद्धांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच महाराणी अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतही होळकरी लष्कराची जबाबदारी समर्थपणे पेलली. अहिल्यादेवींच्या मृत्युनंतर सुभेदारीची वस्त्रे तुकोजीरावाना प्राप्त झाली (१७९५ ते १७९७ ). उत्तम योद्धा, उत्तम नेतृत्वगुण असणारे तुकोजीराव हे उत्तम प्रशासकही होते. १५ ऑगस्ट १७९७मध्ये खडकी (पुणे) येथे त्यांचा मृत्यू झाला.
एवढा मोठा भीम पराक्रम असणाऱ्या सुभेदार तुकोजीराव यांच्या दुरवस्थेत असलेल्या समाधीच्या ठिकाणी यथोचित स्मारक बांधांवे व होळकर छत्रीचा विकास मराठा साम्राज्याच्या सुभेदाराच्या छत्रीला शोभेल अशाप्रमाणे करावा. तसेच होळकर पुलाचे नाव विस्तार त्वरित करून त्याला सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे नाव द्यावे ही मागणी करतो आहे. तसेच समाज बांधवांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून या महाविरास आदरांजली वाहून पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख राजू झंजे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत