करोना लॉकडाऊन काळातील शिक्षण
अनेक वर्षानंतर भारतातच नाही तर संपूर्ण जगात करोना विषाणुची (रोगाची) महामारी आली आहे. औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय या संपूर्ण क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या उलाढाली चालू आहेत. अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण जग यामुळे दहा वर्षें मागे पडल्यासारखे झाले आहे. पण म्हणतात ना, 'जे होतं ते चांगल्यासाठी' या उक्तीप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मात्र वीस वर्षांनंतरची परिस्थिती आत्ताच दाखवली गेली. पूर्व परंपरागत अध्ययन-अध्यापन पद्धती बंद होऊन ऑनलाइन अभ्यास चालू झाला आहे. 'शाळा बंद पण शिक्षण चालू' या तंत्राचा वापर करून विद्यार्थी व शिक्षक आपापल्या घरी बसून अध्ययन अध्यापनाचे काम करत आहेत.
करोना या संकटाच्या परिस्थितीवर मात करत, शिक्षकांनी त्याचे सुवर्णसंधीमध्ये रूपांतर केले आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर शिक्षणासाठी केलेला आहे. व्हिडिओ बनवणे, पीपीटी बनवणे, पीडीएफ बनवणे विद्यार्थ्यांची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जेवढा वापर करता येईल तेवढा वापर या शिक्षकांनी केलेला आहे. या कार्यामध्ये विशेषतः ५० वर्षांवरील शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे. शेवटी 'हाडाचा शिक्षक' आपण म्हणतो ते त्यांच्या कार्यातून दिसून येते.
मी सुद्धा शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे लाॅकडाऊनच्या काळामध्ये काव्यलेखन, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचबरोबर आम्ही तंत्रस्नेही शिक्षकच व इतर समूहांनी आयोजित केलेल्या सा.ज्ञान, दिनविशेष अशा विविध online स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. ब-याच विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ निहाय व्हिडिओ निर्मिती केली आहे. तसेच Google form द्वारे प्रश्नचाचणी निर्माण करून विद्यार्थ्यांना शिकविलेला भाग कितपत समजला यांची पडताळणी केली. Google form द्वारे प्रश्नचाचणी निर्मिती व व्हिडिओ निर्मिती या कार्यशाळा आयोजित केल्या. कुमारभारती समूह (मुंबई जिल्हा) यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने एका क्लिकवर मराठीचे पुस्तक स्पष्टीकरणासह उपलब्ध करून दिले आहे. सर्वांना याचा नक्कीच उपयोग होईल.
आपल्याला पुढील वर्षाचा अनुभव आत्ताच मिळाला असला तरी 'एका नाण्याच्या दोन बाजू असतात' तसेच या ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आहेत. तसेच तोटे देखील आहेत. ते कसे?
तर शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे वर्णनाच्या पलिकडील आहे. शिक्षक कितीही वयाने मोठे झाले तरी ते विद्यार्थ्यांमध्ये गेल्यानंतर बालपणात रमतात. या काळात शाळा बंद त्यामुळे सर्वांना शाळेची खूप आठवण येत आहे. विद्यार्थी दिसत नाहीत. शाळेची घंटा ऐकायला येत नाही. शाळेतील बाके जणूकाही आपली आतुरतेने वाट पाहत आहेत, असे जाणवते. फळा आणि खडू यांचा हाताला झालेला स्पर्श तो आठवत आहे, शाळेत होणारा किलबिलाट चिवचिवाट ऐकायला मिळत नाही. मुलांनी घातलेला गराडा, मधल्या सुट्टीत होणारी जेवणाची देवाणघेवाण नाही. कोणताही दिनविशेष असो कोणताही कार्यक्रम असो शाळेमध्ये आपल्या घरात कार्यक्रम असल्यासारखी जी लगबग असते ती नाही. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली शाळा निर्जीव असल्यासारखी वाटते.
Online शाळेत सुरूवातीला खूपच मजा आली. परंतु नव्याचे नऊ दिवस म्हणतात ना, त्या उक्तीप्रमाणे नंतर काळजीचे, चिंतेचे वातावरण होऊ लागले. कसे? असे तुमच्या मनात आले असेल. Online शिक्षण सुरू झाले, खरे पण समोर अनेक अडचणी संपता संपत नाहीत. एकच मोबाइल घरात दोन- तीन भावंडे, आई-वडिल कामाला- घरात फोन नाही. फोन आहेत- रेंज नाही, फोन आहेत- नेटवर्क अडचण तसेच नेटपॅक भरायला पैसे नाहीत. खायलाच पैसे नाहीत तर नेट कोठून आणणार? म्हणजेच online शिक्षण प्रवाहात फक्त २५% विद्यार्थीच आहेत. बाकीच्यांचे काय?
ज्यांच्याकडे सोई सुविधा उपलब्ध असलेल्या मुलाने online शिक्षणाच्या नावाखाली बॅंकेतील पैसे उडवले, तरी दुसरीकडे बहिणीच्या शिक्षणासाठी डोंगर भागात नेट शोधून स्वतःचा मोबाइल देऊन शिक्षणाला मदत केली. अशा अनेक बातम्या आपण ऐकत आहोत.
शेवटी एवढेच सांगू इच्छिते-----
नवनवीन प्रयोग, कल्पनांची
सांगड घालू या
आलेल्या अडचणींवर मात करूनी मार्ग काढू या
सौ. वर्षा प्रमोद चोपदार,
भैरव विद्यालय, कामराज नगर,
घाटकोपर, मुंबई ७७
--------------------------
Education in the Corona Lockdown period
After many years, there is an epidemic of corona virus not only in India but all over the world. There are various types of turnover in the industrial, cultural, educational and political sectors. There are many problems to be faced. The whole world seems to be ten years behind. But as the saying goes, 'whatever happens is for the better', the situation in the field of education after twenty years has just been shown. Pre-traditional teaching-learning methods have been discontinued and online study has been resumed. Students and teachers are doing the teaching and learning work from their homes using the technique of 'School closed but education on'.
Overcoming this crisis situation, Corona has been transformed into a golden opportunity by the teachers. Teachers have mastered the technology and used it for teaching. Making videos, making PPTs, making PDFs, these teachers have used as much technology as possible to explain the concepts to the students. Teachers above 50 years of age are especially involved in this work. They should be especially appreciated. In the end, what we call the 'teacher of bones' is evident in their actions.
Since I was also in the field of education, I had organized a poetry and handwriting competition during the lockdown. The students responded enthusiastically. At the same time, we encouraged you to participate in various online competitions organized by technology friendly teachers and other groups. Many students have received first, second and third place prizes. Lesson wise videos have been produced using technology during this period. He also created a quiz through Google form to verify how much the students understood the part taught. Conducted quiz creation and video creation workshops through Google form. Kumarbharati Group (Mumbai District) has made available Marathi books with explanations for teachers, parents and students with the help of all teachers at the click of a button. Everyone will definitely benefit from this.
Even if you just got next year's experience, there are 'two sides to the same coin' as well as the benefits of this online education. There are also disadvantages. How is that?
So the teacher-student relationship is beyond description. No matter how old the teacher gets, he plays in childhood as he goes among the students. The school is closed during this period so everyone misses school very much. Students do not appear. I can't hear the school bell. The school children feel as if they are waiting for you. He remembers the touch of fruit and chalk on his hand, he can't hear the chirping in school. The garada worn by the children is not an exchange of meals during the middle holidays. No matter what day it is, no matter what the event is, the school is almost like having an event in your home. The school taken with the help of this technology seems to be lifeless.
Online school was a lot of fun in the beginning. But nine days of the new one is called, as the saying goes, then there is an atmosphere of worry and anxiety. How? You may have thought so. Online education has started, but many problems do not end there. Two-three siblings in one mobile house, parents work-no phone in the house. There are phones- no range, there are phones- network problems as well as no money to pay netpack. If there is no money for food, where will the net come from? This means that only 25% of students are in the stream of online education. What about the rest?
While the boy who had the facility squandered the money in the bank in the name of online education, on the other hand, he helped the education by finding his own mobile in the hilly area for his sister's education. We hear a lot of such news.
That's all I want to say in the end -----
Innovative experiments, ideas
Let's get together
Let's overcome the difficulties and find a way
Mrs. Varsha Pramod Chopdar,
Bhairav Vidyalaya, Kamaraj Nagar,
Ghatkopar, Mumbai 77.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत