एसटीसमोर गुडघ्यावर बसून सेवानिवृत्त कंडक्टर ढसाढसा रडला
सिंधुदुर्ग, दि. ०३ जुलै, २०२०: करोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून गेले पाच ते सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांना मोठा फटका बसला आहे. राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनदायिनी असलेल्या एसटीचे चाकं या लॉकडाऊनमुळे फिरलेलं नाही. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एसटी कर्मचाऱ्याचा मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. वेंगुर्ला बस स्थानकावर एका कंडक्टरचा फोटो काळीज धस्स करुन टाकणारा आहे. आपल्या कामावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा हा फोटो आहे.
ज्या एसटी बसने आपल्याला चार पैसे दिले, संसार सांभाळला. आता त्या एसटीचा निरोप घेताना या कर्मचाऱ्याचे डोळे पाणावले. ३१ जुलै रोजी एसटीसमोर गुडघ्यावर बसून या कर्मचाऱ्याने ढसाढसा रडत या एसटीचा निरोप घेतला. मन हेलावून टाकणारा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
वेंगुर्ला बस स्थानकावर कंडक्टर म्हणून काम करणारे सी. बी. जाधव यांचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच सी. बी. जाधव हे सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्ती झाल्यावर गेली अनेक वर्ष या स्थानकात काम करत असताना असं अचानक स्थानकातून बाहेर पडत असताना जाधव यांचे डोळे भरुन आले. त्यामुळे एसटीसमोर ते गुडघ्यावर बसले आणि हात जोडून आता मी तुझा निरोप घेतो असं म्हणून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यांचा हा फोटो सोशल मिडियात व्हायरल होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत