'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर भव्य-दिव्य पुतळा उभारण्यासाठी बैठक संपन्न
सोलापूर, दि. २ ऑगस्ट, २०२०: महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनपर सर्व धनगर समाज बांधवांच्या स्वप्नातील आपल्या मातेचा भव्य-दिव्य पुतळा उभारण्यासाठी समाजातील बांधवांची मागणी होत होती. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेली वर्षभरापासून राजकीय व विद्यापीठाचे कुलगुरू यांचा पाठपुरावा घेत आहेत. ह्या पाठपुराव्यामुळे पुतळ्याचे डिझाईन लवकरात लवकर प्राप्त करणे आणि पुतळ्याच्या लोकवर्गणीसाठी आवश्यक असणारे नवे बँक खाते उघडण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
महत्त्वाची बाब म्हणजे, पुतळा उभारणी समितीत समाजातील आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह समाजातील राज्याच्या विविध भागातील प्रमुख व्यक्ती आणि विद्यापीठ नामांतरण समितीच्या माध्यमातून लढा देणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा समावेश करावा, अशी विनंतीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीत केली.
देशातील सर्व विद्यापीठातील पुतळ्यांपैकी सर्वात भव्य पुतळा उभारण्याचा आपला मानस असून यासंदर्भात वेगाने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याकडे कल आहे. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस आणि त्यांच्या सर्व टीमने पुतळा उभारणीचे काम तातडीने हाती घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदनही केले.
बैठकीला कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र. कुलगुरू डॉ. देवेंद्र मिश्रा, अधिष्ठाता डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्यासह माऊली हळणवर, प्रा. सुभाष मस्के सर, अमोल कारंडे, शरणू हांडे, समाधान खांडेकर, सत्यवान पांढरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत