Online चा अनोखा उपक्रम

मुंबई, दि. ०७ जुलै, २०२०: आपण आपल्या शाळेत दिनविशेषानिमित्त उपक्रम किंवा स्पर्धांचे आयोजन करतो. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा सण सुरू झाले. पण सद्य परिस्थिती शाळा बंद असे असताना onlineचा उपयोग करून भैरव विद्यालय, घाटकोपर येथील सौ. वर्षा प्रमोद चोपदार या शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या इ. आठवी ते इ. दहावी WhatsApp समूहात हस्ताक्षर स्पर्धा व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोलाज, चारोळी उपक्रमाचे आयोजन केले.


विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच त्यांनी वृषाली खाडयेमॅडम निर्मित 'आम्ही तंत्रस्नेही शिक्षक' समूहात घेतल्या जाणाऱ्या 'मी प्रज्ञावांत' या चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण केली. यासाठी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका व संस्थाचालकांनी मार्गदर्शन व कौतुक केले.
सौ. वर्षा प्रमोद चोपदार,
भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.