राज्यातील इयत्ता १० वी चा निकाल आज दुपारी १ वाजता होणार जाहीर

मुंबई, दि. २९ जुलै, २०२०: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २९) म्हणजेच आज जाहीर होणार आहे. आज दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळांकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.maharesult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या वेबसाइटवर निकाल पाहू शकता. तर www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध केला जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.