राज्यात दहावीच्या परीक्षेत कोकण विभागच अव्वल…!!

मुंबई, दि. २९ जुलै, २०२०: आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत एसएससी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागानेच बाजी मारली आहे. राज्याचा निकाल ९५.३० टक्के एवढा लागला असून कोकण विभागाचा निकाल. ९८.७७ एवढा लागला आहे.

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात ९६.९१ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९३.९० टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा ३.१ टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी ७७.१० टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं.

विभागनिहाय टक्केवारी अशी
पुणे–
९७.३४ टक्के
नागपूर– ९३.८४ टक्के
औरंगाबाद– ९२ टक्के
मुंबई– ९६.७२ टक्के
कोल्हापूर– ९७.६४ टक्के
अमरावती– ९५.१४ टक्के
नाशिक– ९३.७३ टक्के
लातूर– ९३.०९ टक्के
कोकण– ९८.७७ टक्के

यंदाही निकालात मुलींची बाजी
यंदाही निकालात मुलींची बाजी असलेली पाहायला मिळत आहे. यंदा ९६.९१ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण तर ९३.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.०१ टक्क्यांनी जास्त आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.