राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे संजयकुमार यांनी स्विकारली
संजयकुमार यांनी अजोय मेहता यांच्याकडून मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतली
मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनी संजयकुमार यांच्याकडे पदाची सूत्रे हस्तांतरीत केली, त्यानंतर मेहता यांनी पुष्पगुच्छ देवून संजयकुमार यांचे अभिनंदन केले.
मुंबई, दि. ०१ जुलै, २०२०: राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार यांनी आज सूत्रे हाती घेतली. मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनी संजयकुमार यांच्याकडे कार्यभार सोपविला. अजोय महेता यांनी नवे मुख्य सचिव संजयकुमार यांचे अभिनंदन केले.
अजोय मेहता यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ आज संपुष्टात आला. नवे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार यांच्या नियुक्तीचा आदेश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज संजयकुमार यांनी पदाची सूत्रे हाती घेतली.
मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनी संजयकुमार यांच्याकडे पदाची सूत्रे हस्तांतरीत केली, त्यानंतर मेहता यांनी पुष्पगुच्छ देवून संजयकुमार यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत