प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांसंबंधी विधिमंडळात आवाज उठविणार- आ. गोपीचंद पडळकर

प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळास ग्वाही
आटपाडी, दि. १० जुलै, २०२०: महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या सर्व प्रश्नांसंबंधी विधिमंडळात आवाज उठविणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाच्या सत्कारास उत्तर देताना विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकरसाहेब यांनी दिले.

प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या वेतनासाठी c.m.p. प्रणालीचा अवलंब करणे, राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करणे ,विषय शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने रुपये  ४३०० ग्रेड वेतन सुरू करणे, केंद्रप्रमुख यांची पदे अभावितपणे भरणे, शिक्षकांच्या बदल्याबाबत खो-खोपद्धत बंद करणे. याशिवाय अन्य मागण्यांचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकरसाहेब यांना देण्यात आले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान आमदार साहेबांनी केला.

यावेळी जि.प. माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, कार्याध्यक्ष सतीश पाटील, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन सुनीलराव गुरव, माजी चेअरमन यु. टी. जाधव, बाळासाहेब आडके, आटपाडी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, खानापूर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय शिंदे, माजी अध्यक्ष राजाराम शिंदे, शिक्षक नेते सिद्धार्थ कटरे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजीराव देठे, भीमराव सावंत, फुले, शाहू आंबेडकर सहकारी रुग्णालय संचालक बाबासाहेब शेख दीपकराव कुंभार, के. एम. पाटील सर, सयाजी बंडगर, संजय कबीर, हैबतराव पावणे, भास्करराव डिगोळे, भरत कदम, विजयराव पवार, सचिन सासणे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.