दत्ता वाकसे यांनी जाणुन घेतल्या मेंढपाळाच्या व्यथा..!
बीड (प्रतिनिधी), दि. २४ जुलै, २०२०: संपुर्ण जगामध्ये करोनासारख्या रोगाने खुप मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे आणि करोना आटोक्यात येताना दिसत नाही. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील डोंगरद-यात भटकंती करणाऱ्या धनगर समाजाच्या व्यथा मात्र तशाच्या आहेत. शासनाने मेंढपाळ समाजाला न्याय मिळवून दिलेला नाही ह्या कारणाने त्याच्यावर भटकंती करण्याची वेळ येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी गेल्या तीन महिन्यापासून मेंढपाळांना अन्न धान्य, त्याचबरोबर त्यांना आर्थिक मदत करण्यात त्यांनी समाजातील शंभर अधिकारी वर्गाची साथ घेत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे काम त्यांनी जवळपास दोनशे-तीनशे मेंढपाळापर्यंत केलेले आहे.
बीड जिल्ह्यातही खेड्यापाड्यांमध्ये त्याचबरोबर यामध्ये पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यातील धनगर समाजातील मेंढपाळ भटकंती करताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीचा आढावा घेत आज धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी बीड-परळी हायवेवर मेंढपाळांच्या व्यथा जाणून घेत त्यांना आधार देण्याचे काम देखील त्याठिकाणी त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांना काही अडचणी असतील तर सतत संपर्कात रहा त्याचबरोबर कुठेही वनाधिकारी त्रास देत असतील तर तेव्हां अधिकार्याला देखील त्या ठिकाणी जाब विचारण्याचे काम गेल्या काही दिवसापूर्वी दत्ता वाकसे यांनी केले. सामाजिक बांधिलकी जोपासत ते सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात मेंढपाळाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी व्यथा मांडण्याचे काम ते सतत करत असतात त्याच बरोबर ते मेंढपाळाच्या समस्या सोडवण्याचे काम देखील ते करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत