राशिवडे येथील बिबट्याच्या हल्ल्यात बकरी जखमी झालेल्या जोंग कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार - प्रविण काकडे
कोल्हापूर, राशिवडे (प्रतिनिधी) दि. 14 जून, 2020: धनगर समाजासाठी आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे समाजसेवक म्हणजे प्रविण काकडे, या लॉकडाऊनच्या काळात जिल्हा बंदी असताना व अवघे जग ठप्प असतानाही धनगर समाजाविषयी असलेल्या प्रेमापोटी महाराष्ट्र पिंजून काढताना काल राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथील विलास शिवाजी जोंग यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा दिनांक 10 जून 2020 रोजी पहाटे 3
च्या सुमारास हल्ला केला. त्यामध्ये विलास जोंग यांच्या एकूण 200 मेंढ्यापैकी 09 मेंढ्या मृत झाल्या आहेत तर 10 मेंढ्या जखमी अवस्थेत आहेत. ही बातमी समजताच ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे हे समाजाच्या प्रेमापोटी काल शुक्रवार दि.12 जून रोजी राशिवडे येथे विलास शिवाजी जोंग यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली व जोंग कुटुंबियांना आधार देऊन त्यांना शासकीय मदत तसेच स्वतः त्यांना मदतीचे आश्वासन दिले. यावेळी त्यांचे सोबत धनगर समाज नेते प्रा. राजेंद्र कोळेकर, जिल्हाध्यक्ष प्रा. शंकरराव पुजारी, ओंकार कोळेकर, अनिल हजारे, दत्ता जोंग उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत