आमदारकीसाठी इच्छुक 1760 आकडे, योग्य फक्त प्रविण काकडे
समाज सेवेसाठी सदैव तत्पर त्यांचे नांव काकडे. गेली 23 वर्षे अविरतपणे समाजसेवेसाठी स्वतः ला वाहून घेतलेले व कोणत्याही समाज कार्यात अखंड महाराष्ट्रभर आपल्या कार्यातून ओळख निर्माण केलेले समाजसेवक म्हणजे काकडे. आज समाजाच्या नावावर आमदारकी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत, काहींना तर त्यांचे गाव, तालुका सोडून बाकी महाराष्ट्रातील धनगर समाज आज ही ओळखत नाही, पण ते मात्र आमदारकीसाठी समाजच्या नावावर हे पद मागत आहेत हे गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहात. पण या सर्वांचे आजपर्यंत समाजासाठी काय योगदान आहे हे जाणून घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
काकडे यांनी गेली 23 वर्षे आठवड्यातील पाच दिवस नोकरी करून उरलेले 2 दिवस समाजासाठी देत आहेत. धनगर समाजातील युवकांना शिक्षणच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. यांचे कार्य फक्त एका जिल्हापर्यंत मर्यादित नाही तर संपुर्ण महाराष्ट्राबरोबर देशभर सुरु आहे. आपल्या समाज बांधवावर कठीण प्रसंग आला असे समजलं की, प्रवीण काकडे त्यांना मदतीसाठी हजर , मग ते महाराष्ट्रामध्ये कुठेही असो अगदी कोकणापासून ते विदर्भ मराठवाडापर्यंत. आज प्रवीण काकडे महाराष्ट्रामधील कोणत्याही खेड्यात जाऊदेत तेथे त्यांना ओळखणारा व मानणारा धनगर समाज आहे. आज जे कोणी मंडळी समाजाच्या नावावर आमदारकी मिळवण्यासाठी धडपडत आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे की आपण ज्या समाजाच्या जीवावर आमदारकी मागत आहोत त्या समाजासाठी आपलं किती योगदान आहे आणि मग निर्णय घ्यावा. काही लोकांना कदाचित वाटत असेल की काकडे आता राजकरणात कसे? हो तुम्हाला वाटणार साहजिकच आहे कारण हा माणूस आतापर्यंत 23 वर्षे हे समाज सेवेचे व्रत अखंड पणे निभावत असताना त्यांनी अनेक आंदोलन केली. अनेक चळवळी उभारल्या त्याआधारे सामाजिक संघटन केले. पण त्याना राजकीय दबाव निर्माण करता आला नाही आणि तो कार्याचा असेल तर आपला आवाज विधानसभा अथवा विधानपरिषदमध्ये उठवायला हवा यासाठी तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजातील बांधवांच्या आग्रहा खातर ते यासाठी तयार झाले आहेत.
पण काकडे यांनी 23 वर्षे समाज सेवा केल्यानंतर आज समाजासाठी अजून चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी जर ते आपल्याकडे अशी मागणी करत असतील तर यात काय गैर आहे. आज जे कोणी आमदारकीची मागणी करत आहेत त्या मध्ये समाजासाठी केलेले कार्य पाहता काकडे यांना सरस कोणी नसावे म्हणून काकडे या पदासाठी समाजाकडून लायक आहेत. मला मनापासून खात्री आहे हा माणूस जरी आमदार झाला तरी यांची समाजाशी जी नाळ जोडली आहे ती या पेक्षा घट्ट करेल व शेवटच्या श्वासापर्यंत समाज सेवेचे कार्य करेल.
साहेब तुमच्या या अविरत कष्टाला व समाज कार्याला सुपूर्ण महाराष्ट्रचा मनाचा मुजरा व आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.
जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत