निलेगाव येथील स्मशानभुमी पाडणार्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई व्हावी. शासनाने पुर्वीच्या जागेवरच स्मशानभुमी बांधुन द्यावी- राम जवान
तुळजापूर, दि. २७ जून, २०२०: तुळजापुर तालुक्यातील निलेगाव येथील स्मशानभुमीचे बांधकाम पाडलेले प्रकरण गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी. अगोदरची स्मशानभुमी ज्या जागेत होती. त्याच जागेवर स्मशानभुमी तात्काळ शासनाने बांधुन द्यावी. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राम जवान यांनी तुळजापुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदरील ही हिंदु स्मशानभुमी ग्रामपंचायत स्थापनेपासुन याच ठिकाणी आहे. सन 2004 मध्ये शासनाकडुन निलेगाव येथील गावकर्यांना हि स्मशानभुमी बांधुन देण्यात आली होती. यानंतर जवळपास 14 वर्षानंतर म्हणजेच 2016 मध्येही स्मशानभुमी जेसीबीच्या साह्याने येथील शेतकर्याने ती पाडली आहे. तेव्हापासुन आजतागयत येथील ग्रामस्थांचा स्मशानभुमीचा प्रश्न मिटलेला नाही. गेल्या चार वर्षांपासून ग्रामस्थांना मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी हा रस्त्यावर करावा लागत आहे. जर एखादा व्यक्ती 14 वर्षापर्वीचे जुने शासकीय बांधकाम पाडत असेल अन जर प्रशासन डोळयावर पट्टी बांधुन शांत बसत असेल तर कायदा व सुवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्या व्यक्तीस भारतीय दंड संहितानुसार कारवाई होणे गरजेचे आहे. निलेगाव येथील ग्रामस्थावर झालेला हा अन्याय सहन करणार नसल्याचे राम जवान यांनी सांगितले.
तात्काळ चार दिवसात शासनाने येथील स्मशानभुमीची जागा ग्रामस्थांच्या ताब्यात देऊन तेथे नवीन स्मशानभुमी बांधकाम करुन द्यावे. अन्यथा ग्रामस्थासहित अमरण उपोषणास बसणार असल्याचे राम जवान यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत