महाडचे चवदार पाणी पिऊन निगरगट्ट सरकारला पाणी पाजणार – पडळकर

महाराष्ट्र देशा, २५, फेब्रुवारी २०१९, पुणे : २७ फेब्रुवारी पासून राज्यातला संपूर्ण धनगर समाज शेळ्या मेंढ्यासहीत महाड ते विधानभवन असा लॉंगमार्च काढणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह केलेल्या महाड येथील चवदार पाणी पिऊन निगरगट्ट सरकारला पाणी पाजण्यासाठी धनगर समाज अखेरचा लढा उभारणार असल्याची माहिती धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. धनगर समाजाला एससी एसटी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याचा इशारा देखील पडळकर यांनी दिला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी धनगर समाजाचा एससी एसटीमध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागील साडेचार वर्षात काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे धनगर समाजाकडून अखेरचा लढा उभारण्यात येणार आहे. यावेळी राज्यभरातील ३० ते ४० लाख बांधव मुंबईत दाखल होणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. हा लढा कोणा नेतृत्वाचा नसून संपूर्ण समाजाचा आहे, त्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर हे देखील लॉंगमार्चमध्ये सहभागी होणार असल्याचं पडळकर म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलं असून, देखील धनगर समाजासाठी ठाम भूमिका घेतली आहे. राज्यामध्ये ६३ आमदारांचे नेतृत्व करणारा पहिलाच अध्यक्ष धनगरासाठी भूमिका घेत असल्याचं पडळकर म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.