विद्यार्थ्यांनी प्रयत्न करत रहावे : आ. शिवेंद्रसिंहराजे

प्रभात,०१, फेब्रुवारी २०१९, ठोसेघर - गजवडी राजमाता अहिल्यादेवी होळकर महोत्सव पठार विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर व शालेय साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम गजवडीमधील विद्यालयात पार पडला. यावेळी ठोसेघर, राजापुरी, सोनवडी, गजवडी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांना यश अपयशाची चिंता न करता सतत प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला. तर ऑल इंडिया धनगर समाज प्रदेश अध्यक्ष, दिल्ली प्रविण काकडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणानाची कास धरून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन केले.


यावेळी ठोसेघर, राजापुरी, सोनवडी, गजवडी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, इंडिया धनगर समाज प्रदेश अध्यक्ष ऑल प्रविण काकडे, जि. प. सदस्य कमलताई जाधव, मा. नगरसेवक, अशोक शेडगे मा. पं. स. सदस्य शंकर आप्पा चव्हाण, रासप. ता. अध्यक्ष नवनाथ जरग, राज्य करसहाय्यक जी. एस. टी आनंद खरात, अरविंद जाधव, सुर्यकांत गोरे, सरपंच ठोसेघर महादेव सुतार, उपसरपंच ठोसेघर जयराम चव्हाण, एस. डी. जाधव मुख्याध्यापक आदर्श विद्यालय ठोसेघर, सोनवडी गजवडी विद्यालयाचे पाटील, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर महोत्सव पठार विभागाचे कार्यकर्ते संजय शेडगे, प्रकाश पां अवकिरकर, संतोष बावधाने, गौरव खरात, शंकर गोरे, प्रकाश भैरू अवकिरकर व इतरांनी कष्ट घेतले.

साभार : https://bit.ly/2HLY8tN

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.