नरेंद्र मोदी गो बॅकचा धनगर समाजाचा नारा
सकाळ, ८, जानेवारी २०१९, सांगली - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाजाने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. धनगर समाजाला एसटीचे दाखले हातात द्या या मागणीसाठी नरेंद्र मोदी गो बॅकचा नारा देऊन आंदोलन सुरू करण्याचा इशारा समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. धनगर समाजाची अगोदर वचनपूर्ती करा आणि मगच महाराष्ट्रात या, असेही पडळकर यांनीे सागितले.
श्री. पडळकर म्हणाले, उद्या सोलापूर येथे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. या सभेवर धनगर समाजाने बहिष्कार घालण्याचा निर्धार घेतला आहे. तसेच मोदींच्या एकाही सभेला कोणी जाऊ नये अशी हाकही पडळकर यांनी धनगर समाज बांधवाना दिली आहे.
महाराष्ट्रात मोदींच्या सभे दरम्यान लोकशाही पध्दतीने आंदोलन करणार असल्याचे पडळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्या सोलापूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेते पडळकर यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केल्याने खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत