श्यामसुंदर सोन्नर यांना कवी कालिदास पुरस्कार

प्रहार, 13 जानेवारी 2019, मुंबई : आदिवासी धनगर साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दैनिक प्रहारचे राजकीय संपादक, कवी, लेखक, वारकरी आणि ख्यातनाम प्रवचनकार श्यामसुंदर सोन्नर यांना यावर्षीचा राज्यस्तरीय कवी कालिदास पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १८, १९ आणि २० जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, तालूका माण, जिल्हा सातारा या ठिकाणी मल्हारराव होळकर साहित्य नगरीत हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे.


या संमेलनाच्या निमित्ताने सोलापूरचे कवी आणि लेखक गोविंद काळे यांना राजा हाल सातवाहन पुरस्कार, गोंदिया येथील वक्ता, कवी, लेखक तसेच संशोधक प्राचार्य प्रभाकर रामजी लोंढे यांना राजा सम्राट चंद्रगुप्त मौर्य पुरस्कार, माळशिरसचे आमदार रामहरी रुपनवर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार, सांगलीच्या अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र चोपडे यांना संत कनकदास शैक्षणिक सामाजिक कार्य पुरस्कार, म्हसवडचे केंद्र प्रमुख जगन्नाथ वीरकर यांना राजमाता अहिल्यादेवी शिक्षक रत्न पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेडिकल असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे यांना मा. विठोजी होळकर क्रांतिरत्न सामाजिक व वैद्यकीय पुरस्कार, सांगलीचे पांडुरंग रुपनर यांना राज्यस्तरीय सुभेदार मल्हारराव होळकर उद्योजक व समाजभूषण पुरस्कार, सांगलीचे नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने यांना महाराष्ट्र यशवंतराव होळकर पुरस्कार, सोलापूरचे नगरसेवक चेतन नरुटे यांना बॅरिस्टर टी. के. शेंडगे समाजरत्न पुरस्कार, उज्ज्वला गलांडे यांना भीमाबाई होळकर समाजरत्न पुरस्कार, म्हसवडचे महादेव सरतापे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, दहिवडीचे डॉ किरण भरत कारंडे यांना उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.