धनगर समाजाच्या समावेशासाठी आयोगाला निवेदन

तरुण भारत, १०,जानेवारी २०१९,पणजी : धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा या मागणीसाठी मंत्री गोविंद गावडे व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार साई यांना निवेदन सादर करण्यात आले.


धनगर समाजाचा तयार केलेला अहवाल तसेच श्वेतपत्र त्यांना देण्यात आले. गेली अनेक वर्षे धनगर समाजाची मागणी पडून आहे. त्यामुळे आयोगाने केंद्राकडे याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. पाच राज्यातील आठ समाजाच्या समावेशाचा प्रस्ताव असलेले विधेयक लोकसभेत आहे. याच विधेयकामध्ये गोव्यातील धनगर समाजाचा समावेश करावा जेणेकरुन या समाजाला न्याय मिळू शकेल, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली.

यापूर्वी केंद्रीय आदिवासी मंत्रालयालाही धनगर समाजाने निवेदन दिले होते. त्याचीच प्रत आता आयोगाला देण्यात आली आहे. शिष्टमंडळाकडे चर्चा करताना गोवा राज्य मंत्रिमंडळाचा एक ठरावही घेण्याची सूचना आयोगाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार साई यांनी केली. यावेळी डॉ. नंदकुमार कामत यांनी आयोगाला धनगर समाजाबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांचीही आयोगाने भेट घेतली. यावेळी राज्यपालांनीही धनगर समाजाच्या समावेशाबाबत आयोगाला सूचना केल्याचे आयोगाच्या उपाध्यक्षा औसुया विके यांनी सांगितले. यावेळी पर्यावरणवादी राजेंद्र केरकर तसेच समाजाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

साभार : http://www.tarunbharat.com/news/652258

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.