मोदींच्या सोलापुरातील सभेवर धनगर समाजाचा बहिष्कार!
Maharashtra Today, ९ , जानेवारी २०१९ मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात सभा घेणार आहेत. दरम्यान मोदींच्या आजच्या सभेवर सोलापुरातील धनगर समाजाने बहिष्कार घातला आहे. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “धनगरांचा विश्वासघात” केला आहे असा आरोप समाजसेवक गणेश गावंडे यांनी केला आहे. गावंडेंनी सांगितले की, मोदींच्या दिवसभराच्या दौर्यात ते विविध पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी आणि सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी मोदी सोलापुरात येत आहेत यासाठी त्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे.
भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे. आरक्षणाचे आश्वासन न पाळल्याने आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापुरात होणाऱ्या सभेवर सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाने बहिष्कार घातला आहे. 2014 च्या सोलापुरातील प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सत्तेवर येताच तात्काळ निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली होती. परंतू आता पाच वर्षाचा काळ उलटून गेला आणि आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा मोदी सोलापुर दौर्यावर येत आहेत,मोदींनी धनगर मसाजाला आश्वस्त करून आता पाच वर्षे उलटली मात्र, धनगर समाज अद्याप उपेक्षीतच राहीला आहे त्यांमुळे त्यांच्या आजच्या दिवसभराच्या सर्व कार्यक्रमांवर धनगर समाजाकडून बहिष्कार घालण्यात येत असल्याचे गावंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले.
गावंडे म्हणाले की काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मोदी आणि फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धनगर समाजाची फसवणूक केल्याचा दोष दिला होता, आणि धनगरांच्या आरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर धनगरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण धनगर समाजाने भाजपचे समर्थन केले आणि भाजपला बहुमताने निवडून दिले.

धनगर समाजाने भाजपास मोठया आशेने मतदान केले होते.धनगर समाजाच्या मतांच्या जोरावर राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळविल्यानंतर देखील सरकारने आरक्षणाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही.आता धनगर समाज पुन्हा भुलथापांना बळी पडणार नाही हे दाखवून देण्यासाठीच सकल धनगर समाजाने पंढरपूरात झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सोलापूरातील सभेवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
पाच वर्षाचा काळ लोटूनही मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने निवडणुकीपुर्वी दिलेली वचनं पाळली नाही आणि धनगर समाजाची फसवणुक केली असे समाजसेवक गावंडे यावेळी सांगीतले.
मराठा सामाजाला आरक्षण दिल्यानंतर आता धनगर समाजाच्या नेत्यांनीही आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली असून धनगर समजाला शिक्षण आणि सरकारी नौकर्यांमध्ये धनगरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेणार असून सरकारला धनगरांना आरक्षण देण्यासाठी भाग पाडू अशी भूमिका धनगर समाजाचे नेते घेणार असल्याचे कळते.
मतांचं रारकारण करण्य़ासाठी आणि धनगरांची मतं मिळवण्यासाठी ग्रामिण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रवीवारी धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत मी मंत्रालयाची पायरीही चढणार नाही असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर,मात्र, 48 तासांनंतर, त्या राज्य सरकारच्या मुख्यालयात त्यांच्या कार्यालयात गेल्या व फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत उपस्थिती लावली. हे माधमंसमोर आवर्जून सांगायला गावंडे विसरले नाहीत.
दरम्यान, सोलापूर स्थानिक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आरोप केला आहे की सोलापूर जिल्हा प्रशासनाने त्यांना मोदींच्या भेटीदरम्यान निषेध मोर्चासाठी परवानगी नाकारली आणि दिवसभरात शहरातील केबल टीव्ही ब्लॅकआउट करण्यात येईल अशी शक्यताही वर्तवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत