लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण
दैनिक पुढारी, दि. ३० नोव्हेंबर २०१८, मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजासाठीच्या आरक्षणाची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जातीचा लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत धनगर आरक्षणाबाबत तारांकित प्रश्न चर्चेला आला.
काँग्रेसचे शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे रामराव वडकुते, हरिभाऊ राठोड, रामहरी रूपनवर आदी सदस्यांनी हा विषय उपस्थित केला. भाजप सत्तेत आल्यास मंत्रिमंंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे आश्वासन पाच वर्षांपूर्वी दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. मराठा आरक्षणाचा महत्त्वपूर्ण विषय मार्गी लागला. त्यापाठोपाठ धनगर आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावा. यासंदर्भात ‘टिस’ने दिलेल्या अहवालावर सरकारने काय कार्यवाही केली? अशी विचारणा केली. धनगर समाज आरक्षणाच्या जल्लोषाची तारीख जाहीर करा, अशी मागणी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत