उपेक्षित महिला राज्यकर्त्या – महाराणी अहिल्याबाई होळकर

8 मार्च जागतिक महिला दिन जगभर आणि भारतातही साजरा केला जातो. मध्ययुगाच्या अखेरीला महाराणी अहिल्‍याबाईं होळकर या समाजकारणासाठी राजकारण करणार्या पहीली महिला पुरोगामी राज्यकर्त्या ठरतात. आधुनिक भारतात महीला मुक्तीची चळवळ राबविणार्या त्या पहील्या भारतीय महिला ठरतात. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सर्वजन कल्याणकारी राज कारभाराचा आदर्श जगासमोर ठेवला. त्यांची स्तुति परकीय विद्वानांनी केली, नेहरुनींही केली. सूप्रसिद्ध लेखिका इलियानार झेलियट महाराणी अहिल्याबाईं होळकर बद्दल लिहितात, “Historians of the 19th and 20th century… English and American…. agree that the reputation of Ahilyabai Holkar in Malawa and Maharashtra was then, and is, that of a saint. Nothing has ever been discovered by any researcher do discredit that. She was truly magnificent women, an able ruler and a great person.”  शिवराया नंतर महाराष्‍ट्रात हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या नावाखाली पेशव्‍यांनी जेंव्हा धुमाकुळ घातला होता.
पतीबरोबर सती जाणे पुण्‍य आहे,अशी बंधने तिच्‍यावर घालण्यात आली होती. स्त्री, शुद्र-अतिशुद्रांना गुलाम मानले जात होते. त्या काळात थोर क्रांतीकारी सामाजिक राज्‍यकर्त्‍या पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाईं होळकर होऊन गेल्‍या. महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्य पहिले तर त्या मध्य – आधुनीक भारतातील त्या पहिल्या क्रांतीकारी समाजसुधारक महिला राज्यकर्त्या ठरतात. अशा अहिल्‍याबाईंचा जन्‍म 31 में 1725 रोजी अहमदनगर जिल्‍ह्यातील चोंडी या गावी झाला. शिवरायांच्या हिंदवी स्‍वराज्‍याचा झेंडा अटकेपार लावणारे आणि मध्‍य प्रदेशात हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करणारे मल्‍हाररावजी होळकर हे अहिल्‍याबाईंचे सासरे होते. त्‍यांनी प्रजेच्‍या हिताचे, सुख्‍ शांतीचे राज्य निर्माण केले. राजाचा वारस पुत्र खंडेरावाचा लढाईत मृत्‍यू झाला. रुढी परंपरेने सती जाण्‍याची वेळ अहिल्‍याबाईंवर आली. परंतु जनतेसाठी निर्मा्ण केलेले राज्‍य पेशव्यांच्‍या हातात जाऊन प्रजेला त्रास होईल म्‍हणून पाखंडी धर्माच्‍या श्रृखंला तोडून अहिल्‍याबाईंनी सती न जाऊ देता तिच्या हाती राज्‍यकारभार सोपविण्‍याचे काम मल्‍हाररावांनी केले. अहिल्‍याबाईंने सती जाण्‍याचा रुढी रिवाज तोडून, लोक निंदेला न जुमानता, आपण मेलो तर आपल्‍याला सुख मिळेल, परंतु जगलो तर आपल्‍या लाखो प्रजाजनांना सुख मिळेल म्‍हणून सती न जाण्‍याचे ठरवून धर्माच्‍या विरुध्‍द क्रांतीकारी पहिले बंड केले. धर्माच्‍या नावाखाली भारतीय स्‍त्रीला शिक्षणाचा, राज्‍य करण्‍याचा अधिकार नव्‍हता. त्या विरुध्‍द क्रांतीकारी दुसरे बंड करुन अहिल्‍याबाईंने राज्‍य कारभाराची सूत्रे हाती घेतली. कुटूंबातील सासरा, नवरा, मुलगा या सर्वांच्‍या मृत्‍यूनंतर जनकल्‍याणासाठी मनोधैर्य खचू न देता, धैर्याने अहिल्‍याबाईंनी राज्‍यकारभार संभाळला. त्या जास्‍तीत जास्‍त वेळ समाज कल्‍याणासाठी देत. प्रजेचा छळ न करता प्रजेला परवडेल एवढाच कर वसूल केला. करा पासून वसुल केलेला पैसा लोकांच्‍याच हिताकरिता खर्च केला. धन संपत्‍ती ही व्यक्तिगत मालमत्ता नसुन देवाने आणि जनतेने योग्य रितीने विनियोग करण्याकरिता आपल्‍या स्‍वाधीन केलेला तो एक ठेवा आहे, असे त्‍या समजत. वारस नसेल तर दत्‍तक घेण्‍याचा व स्‍वाभिमानाने जगण्‍याचा अधिकार अहिल्‍याबाईंनी प्रजेला दिला होता. प्रजेचे सुख-दुःख स्‍वतः प्रत्‍यक्ष ऐकून घेऊन भेटण्‍यासाठी प्रजेला वेळ देत आणि स्‍वतः न्‍यायाधिशाप्रमाणे काम करीत. अहिल्‍याबाईंच्‍या राज्‍यात जातीभेदाला थारा नव्‍हता. त्‍या सर्व प्रजा समान मानीत. निजामशाही, पेशवाई सारख्‍या राज्‍यातील लोक अहिल्‍याबाईंच्‍या राज्‍यात आश्रयाला येत. एकंदरीत अहिल्‍याबाईंची प्रजा संतुष्‍ट व सुखी होती. कारण प्रजेचा संतोष हाच राज्‍याचा पाया आहे, असा अहिल्‍याबाईंचा विचार होता. प्रजेचा सांभाळ लेकरा प्रमाणे करणे, हा राजधर्म असल्याचे राजमाता अहिल्‍याबाईं मानत. अधिका-याने वा जवळच्‍या माणसाने प्रजेकडून पैसे उकळले तर अहिल्‍याबाईं त्‍याला ताबडतोब शिक्षा करीत. त्यांचा प्रशासनावर वचक होता. सर्व जनतेला न्‍याय मिळावा गावागावात न्‍यायालयाची – पंचायतीची स्थापना केली. प्रत्‍यक्ष राजाला भेटून न्‍याय मिळविण्‍याची व्यवस्था केली. साक्षम पोलीस यंत्रणा-कोतवालाची पदे निर्मीती केली. कृषी आणि वाणिज्‍य या क्षेत्राच्या उत्‍कर्षावर जास्‍त भर देऊन शेतक-यांना न्‍याय मिळवून देण्‍यात आला. प्रजेसाठी, रस्‍ते, पुल, घाट, धर्मशाळा, विहीरी, तलाव बांधले होते. बेरोजगारांना रोजगार मिळण्‍यासाठी रोजगार धंद्याची योजना राबविण्‍यात आली होती. रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी वृक्षरोपण केले होते. भाविक गोर-गरीब लोक तीर्थ्‍ यात्रेला जात असत व तेथे त्‍यांची गैरसोय होऊ नये म्‍हणून अन्‍नदानाची छत्रे, राहाण्‍यासाठी धर्मशाळेची सोय, हे फक्‍त होळकरांच्‍या राज्‍यातच नव्‍हे तर संपूर्ण भारतातील इतर राज्‍यात सुध्‍दा प्रत्‍येक तीर्थयात्रेच्‍या ठिकाणी महाराणी अहिल्‍याबाईंनी उपलब्‍ध करून दिल्या होत्या. अहिल्‍याबाईंनी शत्रूंचा – बंडवाले समाज कंटकांचा बिमोड करुन त्‍यांचे पुनर्वसन केले आणि राज्‍यात शांतता प्रस्‍थ‍ापित केली. राज्‍य कारभार, समाज व्‍यवस्‍था, कायदे कानून वगैरे बाबत सुधारणा केल्‍या. त्‍यामुळे राज्‍यात शांतता व सुबत्‍ता लाभली. राजमाता अहिल्‍याबाईंचे राजकारण एकंदरीत शांततेचे होते. पंडीत नेहरुनीं देखील शांतताप्रिय राज्‍यकर्त्‍या म्हणुन अहिल्‍याबाईची नोंद केली आहे. महारानी अहिल्‍याबाईंने इ.स. 1765 ते 1795 या प्रदीर्घ कालावधीत राज्‍य केले. 13 ऑगस्‍ट 1795 रोजी लोकमाता अहिल्‍याबाईंचा मृत्‍यू झाला. अहिल्‍याबाईंच्‍या राज्‍य कारभाराबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल मराठी, उर्दु , इंग्रजी कवी, लेखकांनी फार मोठ्या प्रमाणात साहित्‍य लिहून ठेवलेले आहे. पेशवाई आणि इतर राज्याची तुलना केली तर त्‍या काळात राजमाता अहिल्‍याबाईं फार मोठ्या क्रांतीकारक सामाजिक – राज्‍यकर्त्‍या होऊन गेल्‍या, हे सत्‍य समोर येते. स्‍वातंत्र्यानंतर जे अनेक कलमी कार्यक्रम राबविले जात आहेत, ते सर्व लोकमातेच्‍या राज्‍यात राबविण्‍यात आलेले दिसून येते. महारानी अहिल्‍याबाई होळकर यांनी तब्‍बल 30 वर्षे समर्थपणे राबविलेल्‍या शासन यंत्रणेतून धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्‍कृतिक आघाडीवर क्रांतीकारक कार्य केले. यातून  राजमातेची शक्‍ती आणि युक्‍ती दिसून येते. त्‍या केवळ धनगर समाजाच्‍याच नव्‍हे तर तमाम भारतीय जनतेच्या आदर्श ठरतात. लोकमातेच्‍या धार्मिक, सांस्‍कृतिक, आर्थिक, सामाजिक आणि मुख्‍यत्‍व राजकीय प्रेरणा स्‍त्रोतातून किमान एक पैलू  पकडून, प्रेरणा घेऊन देशाने वाटचाल केली असती तर भारत – भारतीय समाज आज एक मागास – दुबळा देश-समाज म्‍हणून ओळखला गेला नसता.
भारतीय राज्‍य घटनेने सर्व प्रकारच्या समतेची हमी भारतीय जनतेला दिली आहे. भारतीय राज्‍य घटनेने केवळ व्‍यक्‍ती – व्‍यक्‍ती मध्‍येच नव्‍हे तर वेगवेगळ्या समाज वर्गामधील विषमता कमी करण्यासाठी तसेच दर्जा, सुविधा व संधि यामध्ये असलेली विषमता कमी करण्‍यासाठी राज्य (शासन) प्रयत्‍नशील राहील अशी हमी भारतीय जनतेला दिली आहे. तरीही भारताच्‍या स्‍वातंत्र्याची 65 वर्षे व भारतीय प्रजासत्‍ताकाची 62 वर्षे उलटून जावुनही भारतात 10 टक्‍के महाराष्‍ट्रामध्‍ये 17 टक्‍के लोकसंख्‍या असलेला धनगर समाज असताना पर्याप्त सामाजिक आणि आर्थिक भागीदारी पासून वंचित आहे. धनगर समाजात राजकीय जागृतीचा अभाव हे धनगर तत्सम इतर समाजाच्या मागासपणाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे लोकशाही भारतात प्रचंड अन्याय होवूनही हा समाज गप्प आहे. मराठा, माळी, कोळी, मातंग, बौध्‍द, मुस्‍लीम, ब्राह्मण सर्व समाजात पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवीं बद्दल आदरभाव आढळतो. परंतु मराठी साहित्‍यात पुण्‍यश्‍लोक कोठे आहे ? हिंदू धर्म, संस्‍कृति रक्षिता अहिल्‍यादेवींच्‍या नावाने महाराष्‍ट्रात एकही सांस्‍कृतिक केंद्र का नाही ? वृत्‍तपत्रे, दूरदर्शनमध्‍ये पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे दर्शन का नाही ? असे प्रश्‍न पडतात. केवळ धनगर वाड्यातच अहिल्‍या जयंती वा पुण्‍यतिथी का? असाही प्रश्‍न पडतो. “प्रसार-प्रचार” यंत्रणेचा दोष स्पष्ट दिसतो. त्यामुळे प्रचार-प्रसार यंत्रणेवर नियंत्रण कोणाचे ? असाही प्रश्‍न पडतो.  तात्‍पर्य, पुण्‍श्‍लोक असूनही अहिल्‍यादेवी उपेक्षित आहे. तिला उपेक्षित कोणी ठेवले आहे ? त्‍याला जबाबदार कोण आहे ?
लुटारु-भिल्‍लांना “भिलकवडी ” नावाच्‍या कराद्वारे उत्‍पन्‍न आणि उदरनिर्वाहाचे साधन देणारी, मोफत तसेच तूर्त न्‍याय देणारी, पोस्टाची व्‍यवस्‍था करणारी, लिखित साहित्‍य  बाळगणारी, औषधांची जाण असणारी, फौजेला वेगवेगळ्या वेळी भरपूर पगार देणारी, हिंदू-जैन-बौध्‍द-गुरुद्वारा सहित मु‍स्लिम दर्गा-मस्जिद-पिरांना आणि ख्रिस्त्यांच्या गिरिजा घराना दानधर्म देणार्या महाराणी अहिल्‍याबाईं होळकर सर्वजन कल्याणकारी पहिली भारतीय महिला राज्यकर्त्या ठरतात. देव, धर्म, देवळांना, ब्राह्मणांना दक्षिणा देणारी, शिव पिंडाची पूजा अर्चना करणारी, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या अशी प्रतिमा जनमानसात बिंबवली गेल्‍याचे मी पाहिले. छत्रपति शिवरायाचा वारसा ख-या अर्थाने राजमाता अहिल्‍याबाई होळकर यांनी 30 वर्षे सांभाळला होता. सातारचे वा कोल्हापुरचे छत्रपती कमजोर बनले होते. कारभारी पेशवे शिरजोर बनले होते. सर्वजन कल्याणकारी राज्यकारभारामुळे प्रजा त्यांना देवी मानु लागली. परंतु धर्मशील अहिल्‍यादेवींनी तलवारही पकडली होती. त्यामुळे पेशव्यांसहीत इतर इंदुर च्या वाटेला जात नसत. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचा धार्मिक चेहरा लोकांसमोर आणला गेला होता. परंतु राजकर्त्या तलवारधारी महाराणी अहिल्‍याबाईंचा चेहरा लपविला गेल्याचे दिसते. 1994 साली तलवारधारी महाराणी अहिल्‍याबाईंचा प्रचार यशवंत सेना आणि यशवंत नायक या पत्रका द्वारे मी सुरु केला. टिका – टवाळी झाली व जवाबही दिले. आज धनगर समाजात एक प्रचंड राजकीय आणि सामाजिक जागृती होत आहे. याचे श्रेय महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांच्‍या प्रतिभेस आणि प्रतिमेस जाते. परंतु प्रचारा अभावी विचार मरतात. प्रचार नसल्याने महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांचा विचार मागे पडला आहे. महाराणी असूनही अहिल्‍याबाईं होळकर उपेक्षित ठरल्या आहेत. महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांच्या घराण्यातील 60 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात, असे एक रिपोर्ट सांगतो. राजकर्त्या धनगर समाजाची ही अवस्था असेल तर इतर समाजाची अवस्था काय असेल? ही अवस्था जाणुन पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे ” सामाजिक आणि राजकीय स्‍वरुप ” महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांची प्रतिमा प्रकाशित करण्‍याचे कार्य आम्ही 18 वर्षात यशवंतसेना आणि राष्‍ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातुन केले. सर्वजन उद्धारक, समर्थ राज्‍यकर्त्या, कुशल प्रशासक, वीरांगना महाराणी अहिल्‍याबाईं होळकर यांची प्रेरणा घेऊन 31 में 2003 रोजी महाराणी अहिल्‍याबाई होळकर यांच्‍या जयंती दिनी अहमदनगर येथील चोंडी या त्यांच्या जन्‍मगावी राष्‍ट्रीय समाज पक्षाची स्‍थापना केली. चौंडी येथे दरवर्षी 31 मे रोजी जनजागरण मेळावे आयोजित केले गेले. राजमाता जन्मगाव चोंडी आणि महात्मा फुले जन्मभुमि कटगुण यांना आधुनिक तीर्थक्षेत्रे बनविली. महाराणी अहिल्‍याबाईं होळकर राजकर्त्या होत्या म्हणुन समाजकारण करु शकल्या. परंतु इतिहास विसरल्याने एके काळचा राजकर्ता – राजा समाज, कायदे बनविनारा शासक न बनता केवळ वोटर बनला.
मध्ययुगाच्या अखेरीला महाराणी अहिल्‍याबाई होळकर या समाजकारणासाठी राजकारण करणार्या पहीली महिला राज्यकर्त्या ठरतात. तसेच आधुनिक भारतातील महीला मुक्तीची चळवळ राबविणार्या पहीली भारतीय महिलाही ठरतात. या पार्श्वभुमीवर राजकीय आणि सामाजिक जागृतीचा संदेश महाराष्‍ट्रातील आणि देशातील शक्‍य त्‍या भागात धनगर सहित तमाम राष्‍ट्रीय समाजा पर्यंत पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न राष्‍ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातुन केला जात आहे. सिना नदीच्या काठी वसलेल्या राजमाता अहिल्‍याबाईं होळकर यांची जन्मभुमि चोंडी येथे 31 में 2003 रोजी स्थापित राष्‍ट्रीय समाज पक्षाची गंगोत्री आता कन्‍याकुमारी ते काश्मिर तसेच कच्छ ते बंगाल असा पसरत आहे. इंग्रजांच्‍या राज्यात भारतात ख-या अर्थाने समाज सुधारकांची चळवळ महात्‍मा फुले यांनी सुरु केली. धर्माची सुत्रे ठराविक लोकांच्‍या हातात असल्याने स्त्री, शुद्र-अतिशुद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्‍हता. भारतीय स्‍त्री कोणत्‍याही जातीची अगदी ब्राह्मण असली तरी तिला शुद्र म्‍हणूनच वागणूक मिळत होती. तेंव्हा जोतीबा फुले – सावित्रीबाई फुले या पति-पत्नीने समाज सुधारनेचे काम केले. भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेड महात्‍मा जोतीबा फुले यांनी रोवली. त्यासाठी शिक्षणाचे माहेर घर मानल्या गेलेल्या पुणे येथे ब्रह्म-विद्द्य जनांचा प्रचंड विरोध सहन केला होता. आज भारताच्या राष्ट्रपति पदी महिला आहेत. स्वतंत्र भारतात एका महिलेने अनेक वर्ष पंतप्रधान भोगले. याला मूलत: कारण महाराणी अहिल्‍याबाई होळकर आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा वारसा आहे. म्हणूनच जागतिक महिला दिन साजरा करीत असता महाराणी अहिल्‍याबाईं होळकर आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची आठवण करणे, आपणा सर्वांचे कर्तव्य ठरते.
– महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.