महाराजा यशवंतराव होळकर सेकुलर आणि राष्ट्रवादी होते – महादेवजी जानकर

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. महादेवजी जानकर आपल्या भाषणात म्हणाले, “ महाराजा यशवंतराव होळकर यांना जातीत बसविता येत नाही, त्यांना जातीत बसवु नये. महाराजा यशवंतराव होळकर सेकुलर होते आणि राष्ट्वादी होते. त्यांच्या दरबारी व सैन्यात विविध जाती, धर्म, प्रदेश, राज्ये, वंश तसेच देशाचेही लोक होते. भारताच्या मोठ्या भुभागावर महाराजा यशवंतराव होळकर यांनी ताबा मिळविला होता. एक समाज आणि एक राष्ट्र हे त्यांचे स्वप्न होते.
तत्कालीन ब्रिटिशांची राजधानी कलकत्त्यावर हल्ला करुन इंग्रजाना या देशाबाहेर काढणे, हे महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुख्य लक्ष्य होते. परंतु पेशव्यांनी साथ दिली नाही. शिंदे, भोसले आदींनी अडथळे निर्माण केले.” मा. जानकर पुढे म्हणाले, महाराजा यशवंतराव होळकर सारखेच आम्हाला आमचा पक्ष- राष्ट्रीय समाज पक्ष देशाच्या चारही सिमांना नेऊन भिडवायचा आहे. संसदेत दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांची भाषणं प्रभावी होताना दिसते. या ओबीसी नेत्यांच्या प्रभावी युक्तीवादा मागे नरके सरांसारख्या थिंक ट्यांकचे योगदान आहे. नरके व सोनवणी सारख्या विचारवंतांची आम्हाला गरज आहे. यापुढे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर वाकडी नजर टाकणा-यांनी खबरदार व्हावे.” अशा प्रकारे जानकर साहेबानी विचारवंताची राजकारणाच्या सबलीकरनातील भूमिका विशद केली. त्याच बरोबर विचारवंताना धमकावणा-या हुकूमशाहाना निर्वाणीचा ईशारा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.