यशवंत सेनेच्या दणक्याने मेंढपाळा़ंची तात्काळ सुटका

सोलापूर, ०३ जुलै, २०२०: कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी विजय रानगे, भगवान हजारे, सर्जेराव हजारे, गुंडाप्पा शेळके, बाबासो शेळके, कार्तिक शेळके- वळीवडे, अजित बोराडे, महादेव लांडगे, मधू बोराडे, तुकाराम रेवडे- हुन्नुर, शिवाजी वळकुंचे- उचगाव हे मेंढपाळ आपल्या शेळया मेंढ्या घेऊन दुजारपुर सांगोला तालुका जिल्हा सोलापूर येथे माळरानावर आपल्या मेंढ्या चारत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडवून मे़ंढपाळ व मे़ंढरा़ना पकडून (तीस हजार रुपये) ३० हजार रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी देऊन मेंढपाळ यांना अडवून ठेवले. अशी माहिती मला मेंढपाळ विजय रानगे व कृष्णात रेवडे गडमुडशिंगी यांनी फोनवरून दिली आणि साहेब काही तरी करून मेंढपाळ यांना सोडवा असे सांगितले. विजय रानगे या मेंढपाळाच्या मोबाइलवर परत फोन करुन लगेचच सविस्तर माहिती घेतली, तर तिथे कोणत्याही प्रकारची झाडे अथवा वनविभाग यांनी लावलेली रोपवाटिका नसताना माळरानावर मेंढपाळ यांना का अडवले? असे विचारताच... मुजोर झालेले कर्मचारी स्वतःचे नाव अथवा फोनवर बोलेनात फक्त पैसे द्या मग सोडतो असे फक्त बोलत होते.

संजय वाघमोडे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर यांनी सोलापूर जिल्हा यशवंतसेना अध्यक्ष दिपक गडदे यांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन लगेचच सोलापूर जिल्हा वनकार्यालायत जाऊन घडलेला गंभीर प्रकार वरिष्ठांना सांगुन मेंढपाळाना मदत करून तात्काळ सोडण्यात यावे असे सांगितले. दिपक गडदेसाहेब जेवण करत होतो पण मेंढपाळांच्या प्रश्न आहे असे म्हटल्यावर जेवण सोडून लगेचच सोलापूर वनकार्यालायतील वरीष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन घडलेला गंभीर प्रकार सांगून मेंढपाळ यांची यशवंत सेना स्टाईलने एक रुपयाही न देता त्यांची मुक्तता केली. या कामी बंडगरमॅडम, डॉ. उषा देशमुखमॅडम संचालक सांगोला सुतगिरण, सागर माने जुनोनी व रामचंद्र कबाडगे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

संजय वाघमोडे- जिल्हाध्यक्ष
यशवंत सेना कोल्हापूर
9405073872, 8766848986

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.