०६ ऑगस्ट २०२०

बापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं...

सोलापूर, दि. ०५ जुलै, २०२०: बेताच्या परिस्थितीत शिकून अधिकारी होणं काय असतं हे यशस्वी विद्यार्थ्याशिवाय इतर कुणीही ओळखू शकत नाही. यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या १२ विद्यार्थ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांत कुंडलिक खांडेकर याची मेहनतही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.

श्रीकांत खांडेकर हा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मजुरी करुन जीवन जगणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी… श्रीकांतने देशात ३३वा क्रमांक मिळवला. मंगळवेढ्यातील बावची गावात राहणारे त्याचे वडील अशिक्षित आहेत, पण त्यांनी मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व वेळीच ओळखलं होतं. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन एकर जमीन विकली, पण शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही.

कुटुंबीय आपल्यासाठी करत असलेल्या कष्टाची श्रीकांतने जाणीव ठेवली आणि त्याने स्वतःही जीव ओतून अभ्यास केला. श्रीकांतचं सुरुवातीचं शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत झालं. निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सोलापुरात बारीवपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. दापोलीच्या कृषी विद्यापीठातून त्याने कृषी अभियात्रिकीचं शिक्षण घेतलं. याच काळात त्याची आयआयटीतही निवड झाली. पण त्याने तिकडे न जाता यूपीएससी परीक्षा देण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम होता.
खरं तर अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीमध्ये निवड होणं हे एका स्वप्न पूर्ण होण्यापेक्षा कमी नसतं. पण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि त्यासाठी तेवढी जिद्दही महत्त्वाची असते. श्रीकांतने पुण्यात एक वर्ष अभ्यासाला सुरुवात केली. नंतर सहा महिने दिल्लीत अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात त्याने देशात ३३वा क्रमांक मिळवला. ओबीसी प्रवर्गात राज्यातून तो दुसरा आहे.

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत श्रीकांत खांडेकर यांनी २३१ क्रमांकाची रँक मिळवली आहे. श्रीकांत खांडेकर हे कलेक्टर झाले, त्यावेळी त्यांची आई शेतात खुरपण करत होत्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात २३१व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या कष्ट करत वडीलांनी तीन एकर जमीन मुलाच्या शिक्षणासाठी विकली आणि प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलाचे शिक्षणावर खर्च केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अखेर मुलाने कलेक्टर बनण्याचे ध्येय पूर्ण केले.

दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या बावची गावात जिरायत शेतीत केलेला खर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करून जगणाऱ्या बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी स्वत: अशिक्षित असूनही आपल्या तीन मुलांना शिक्षित केले. थोरल्या मुलाने मार्केटिंगच्या माध्यमातून रोजगार मिळवला आणि दुसरा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. तिसऱ्या मुलाचे पदवीचे शिक्षण सुरू आहे. बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर श्रीकांतने निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शिक्षण झाल्यानंतर दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आयआयटीत झालेली निवड सोडून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे येथे एक वर्ष तयारी केली. त्यानंतर दिल्लीत सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परीक्षेत देशात ३३वा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला. दहावीपर्यंत मराठी माध्यमानंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. सुरवातीला इंग्रजी विषयाशी संघर्ष करावा लागला, पण परिस्थितीची आईवडिलांनी जाणीव करून दिली नसल्याने लोकसेवा आयोगात चांगले करिअर करता आले.
या यशाबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाला, शहरी भागातील मुलांच्या परिस्थितीशी तुलना न करता आपले ध्येय समोर ठेवून तयारी केल्यास यश मिळू शकते. आज लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच बावची गावावर आनंदाचे वातावरण पसरले असून, वडील आजारी असल्यामुळे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेले. स्वतःजवळ मोबाइल नसल्यामुळे दवाखान्यात फोन करून मुलगा कलेक्टर झाल्याचे नातेवाइकांनी कळवले. तर आई शेतातच कष्ट करत असल्याची आढळून आली.

मुलाच्या यशाबद्दल आई कमल खांडेकर म्हणाली, मुलाच्या यशाने आमचे कुटुंब सुखी झाले. अजूनही कष्ट करत असून, शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज आजही भरतोय. कष्ट करतोय. कुणाशी लबाडी केली नसल्याने मुलाने सार्थकी लावले. परीक्षेतील यशाप्रमाणे प्रशासनातील कामात देखील त्याने आपला ठसा उमटवावा. गोरगरिबांची सेवा करावी, एवढीच अपेक्षा आहे.

मुलाच्या या यशाने कुटुंबीय भारावून गेलेत. मुलाने आपली मेहनत सार्थकी लावली, अशी भावूक प्रतिक्रिया श्रीकांतचे वडील देतात. मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी यूपीएससी स्तरावर इंग्रजीत देशपातळीवरच्या स्पर्धेत टिकणं हे मोठं आव्हान असतं. पण महाराष्ट्रातल्या मुलांनी हे आव्हान कायमच पेललं आणि श्रीकांतनेही हेच पुन्हा सिद्ध केल. श्रीकांत सध्या २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मुलाखतीसाठी तयारी करतो. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षाही तो पास झालाय. त्यामुळे २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मुलाखतीची तो तयारी करत आहे. यामध्येही यशस्वी झाल्यास त्याचा आयपीएस, आयएएस, भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) यासह इतर सेवांमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
श्रीकांतला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा