ठाकरे कुटुंबातील कुणी असं करणार नाही: मनसेकडून आदित्य यांची पाठराखण

मुंबई, दि. १४ ऑगस्ट, २०२०: ठाकरे कुटुंबातील कुणी व्यक्ती असं काही करणार नाही, असं सांगत मनसेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली. ठाकरे घराण्यातील व्यक्तीचा अशा प्रकारच्या घटनेत सहभाग असेल असं मला वाटत नाही. 

भाजपच्या आरोपामुळेच हा वाद सुरू झाला आहे. सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वांनीच केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेलं आहे. त्यामुळे चौकशी होत असल्याने त्यातून सत्य बाहेर येईल, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

--------------------------------------------------------

No one in the Thackeray family will do that: MNS follows Aditya

Mumbai, dt. August 14, 2020: No member of Thackeray's family will do such a thing, saying that MNS has followed Environment Minister Aditya Thackeray. Aditya Thackeray is being charged in Sushant Singh Rajput suicide case. Against this backdrop, MNS leader Bala Nandgaonkar sided with Aditya Thackeray while explaining the party's role. I don't think a person from the Thackeray family would be involved in such an incident.

The controversy has started due to BJP's allegations. Everyone has demanded a CBI probe into Sushant's case. NCP president Sharad Pawar has reacted to it. The case has also gone to the Supreme Court. Therefore, the truth will come out from the investigation, said Bala Nandgaonkar.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.