महाराष्ट्राच्या इतिहासातील मेंढपाळ बांधवांसाठीचे सर्वात मोठे आंदोलन

 पुणे, दि. ०७ जुलै, २०२०: महाराष्ट्रातील धनगर मेंढपाळावर होणाऱ्या हल्ले व अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र यशवंत सेनेचा एल्गार... मेंढपाळांवरील हल्ले थांबावे यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यात तसेच पुणे येथील महाराष्ट्र यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख बिरु कोळेकर, संघटक सुनील शेंडगे, डॉ. उज्वला हाके, सागर शिंगारे, युवा उद्योजक विवेक बिडगर, रोहित पांढरे, पत्रकार विकासजी माने व पत्रकार सोमनाथ देवकाते यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा. महाराष्ट्र यशवंत सेनेची निवेदनाद्वारे मागणी...राज्यभरात जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात २०९ ठिकाणी निवेदन देण्यात आली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, नाशिक, धुळे, लातूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, चंद्रपूर, बुलढाणा, नांदेड, वाशीम, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, हिंगोलीसह महाराष्ट्रात  महाराष्ट्र यशवंत सेनेने राज्यभरातील २०९ ठिकाणी मेंढपाळांवरील हल्ले थांबावे यासाठी निवेदन दिले. मेंढपाळ बांधवांसाठी महाराष्ट्र यशवंत सेना एक प्रकारे आजपासून एल्गार पुकारला आहे. शेती नसल्यामुळे किंवा पुरेश्या चाऱ्या अभावी आपले गाव सोडून गावोगावी भटकंती करून मेंढपाळ आपला उदरनिर्वाह करतात. मात्र या मेंढपाळ बांधवांवरती गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंड, टवाळखोर यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण खुप वाढलेले आहे, बरेच ठिकाणी तक्रार तर लांबच साधी दखल ही स्थानिक गावगुंडांच्या राजकीय /आर्थिक  दबावामुळे पोलीस प्रशासन घेत नाही. सद्य स्थितीत राज्यात रोज अशी दोन ते तीन प्रकरणे कुठे तरी घडतच आहेत. त्यामुळेच निवेदनाच्या माध्यमातून शासनाचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र यशवंत सेनेचे सरचिटणीस संतोष वाघमोडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र यशवंत सेनेचे राज्यभरातले उपाध्यक्ष, संघटक, जिल्ह्याप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख तसेच इतर पदाधिकारी यांनी ही निवेदन दिली आहेत. आज शांततेच्या मार्गाने निवेदन दिली आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन सर्व मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा येत्या काळात मेंढपाळ बांधवांच्या सन्मासाठी महाराष्ट्र‌ यशवंत सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे यांनी दिली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.