गणेशोत्सव कसा साजरा करावा: ही आहे नियमावली
सिंधुदुर्ग, दि. १३ ऑगस्ट, २०२०: करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव कसा साजरा करावा, याची नियमावली जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जाहीर केली आहे.
ही नियमावली पुढीलप्रमाणे:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता राहणार नाही. परंतू इतर खासगी वाहनांद्वारे जिल्हयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांकरीता ई-पास सक्तीचा आहे. हा पास covid19.mhpolice.in या पोर्टलवरुन उपलब्ध करून घ्यावा.
१२ ऑगस्ट, २०२० पर्यंत गणेशोत्सवासाठी जे नागरिक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस किंवा अन्य खासगी वाहनांद्वारे सिंधुदुर्ग जिल्हयात आगमन करतील त्यांना दहा दिवसांसाठी गृह विलगीकरण करण्यात येईल. त्याकरीता नागरिकांना कोणत्याही कोविड-१९ च्या चाचणीची आवश्यकता राहणार नाही.
अशा व्यक्तींनी ३ दिवस घराबाहेर पडू नये. स्थानिक आरोग्य यंत्रणेने त्यांना लक्षणे नसल्याची खातरजमा / शहानिशा करावी. जिल्हयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची जिल्हयाच्या सीमेवरच आरोग्य तपासणी करण्यात येणार, 10h at Brir fari YOU THT pulse oximeter, thermal scanner, rapid antigen test kit चेक पोस्टवर उपलब्ध करून द्यावे. आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती, comorbidities दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींची रेपिड अँँटीजन टेस्ट करण्यात येईल.
उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी तालुका पातळीवरील संबंधित गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांच्या बैठका घ्याव्यात. सदर बैठकीस गाव नियंत्रण समिती, वॉर्ड नियंत्रण समितीच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करावे. गणेशोत्सव कालावधीत पार पाडावयाच्या जबाबदारी, तसेच गावातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबतचे नियोजन करावे व संबंधितांस अवगत करावे.
जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवावी. सर्व तहसिलदार यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करावी. तसेच क्षमता वाढविणेस व सोयी सुविधा देणेस आरोग्य विभागाला आवश्यक ते सहकार्य करावे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती करीता २ फुटांच्या मर्यादेत असावी.कोव्हीड-१९मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश दर्शनाकरीता गर्दी होणार नाही तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळतात याची खातरजमा मंडळाचे अध्यक्ष यांनी करावी. मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणेशोत्सव कालावधीत गणपती मंडळाला भेटी दिलेल्या व्यक्तींची नोंद करण्यासाठी संबंधित गणेशोत्सव मंडळाने स्वतंत्र नोंदवही ठेवावी, जेणेकरुन यदाकदाचित बाधित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोईचे होईल. उत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर हार / नारळ / मिठाई इ . दुकाने लावण्यात येऊ नयेत. यावर्षी गणेशोत्सव कमीत कमी दिवसाचा साजरा करावा. घरगुती गणपतीची पूजा शक्यतो स्वतःच करावी. पुरोहित यांनी जास्तीत जास्त ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर करावा. गणेशोत्सव कालावधीत भजन, आरत्या, फुगड्या, किर्तन, गौरीववसा इत्यादी कार्यक्रम घरगुती स्वरुपात कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करावेत. या कार्यक्रमांच्या निमित्ताने घरोघरी फिरुन भेट देणे टाळावे.
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, वाडीतील / गावातील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणुक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. शक्यतो घराजवळच्याच विसर्जन स्थळी मुर्तीचे विसर्जन करावे.
विसर्जनावेळी कोविड-१९ बाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. याबाबत गाव समिती / प्रभाग समिती यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आवश्यक ती दक्षता घ्यावी. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे घोषित केलेल्या अथवा नव्याने घोषित केल्या जाणाऱ्या प्रतिबंधितक्षेत्राच्या बाबतीत संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेशानुसार प्रतिबंध लागु राहतील. कोविड–१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हा गणेशोत्सव साजरा करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत