कॅप्टन अमोल यादव यांच्या प्रकल्पास शासन सर्व सहकार्य करणार: उद्योगमंत्री सुभाष देसाई

 मुंबई, दि. १९ ऑगस्ट, २०२०: कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिक देखील यशस्वी झाले आहे. यापुढे नागरी उड्डाण मंत्रालयाची (डीजीसीए) मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल. त्यांना प्रकल्प उभारण्यासाठी जागा दिली जाईल.

कॅप्टन अमोल यांचा प्रकल्प लागु करण्यासाठी उद्योग विभागाच्यावतीने एक बैठक घेतली जाईल. यामध्ये एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. शासनाकडून उद्योगांसाठी दिले जाणारे प्रोत्साहन कॅप्टन अमोल यांच्या प्रकल्पाला दिले जाईल, असे उद्योगमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

एका मराठी माणसाने विमान तयार करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरविले आहे, त्याचा सर्वांना अभिमान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. यापुढे देखील राज्य शासन त्यांना सर्व सहकार्य करेल, असे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.

-----------------------------------------

The government will support Captain Amol Yadav's project: Industry Minister Subhash Desai 

Mumbai, Dt. August 19, 2020: Captain Amol Yadav builds an Indian-made aircraft. The Government of Maharashtra will extend all possible cooperation for his next project, Industry Minister Subhash Desai said here today. Captain Amol Yadav has worked hard to build an Indian-made aircraft. His demonstration has also been a success. From now on, after getting the approval of the Ministry of Civil Aviation (DGCA), all the cooperation will be done on behalf of the industry department for the next project. They will be given space to set up the project.

A meeting will be held on behalf of the industry department to implement Captain Amol’s project. It will be attended by senior officials of MIDC. The incentives given by the government for industries will be given to Captain Amol's project, Industry Minister Desai clarified.

A Marathi man dreamed of building an airplane and it has come true, everyone is proud of it. Chief Minister Uddhav Thackeray has also praised the project. The state government will continue to co-operate with them, said Desai.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.