तुकाराम मुंढेंचा दणका, कामचुकार ९ कर्मचाऱ्यांना केले निलंबित; घड्याळावरुन लोकेशन ट्रॅक करून केली कारवाई

मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका

नागपूर, दि. २५ जुलै, २०२०: राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ९ कर्मचा-यांना निलंबित केल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या घड्याळावरुन त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं. यानंतर संबंधित कर्मचारी कामाच्या वेळी इतर ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर आयुक्त मुंढे यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या या ९ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कामाच्या टाळाटाळीची चर्चा नेहमीच होत असते. सामान्य नागरिक नेहमीच या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करतात. मात्र, यंत्रणांच्या ठिम्मपणापुढे नागरिकही निराश होऊन हार मानतात. परंतु नागपूरात वेगळेच घडले. आयुक्त मुंढे यांनी सकाळी ६ वाजता नागपूरच्या हजेरी शेडला भेट दिली. या ठिकाणी ९ कर्मचारी गैरहजर होते. तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या घड्याळावरुन त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं. यानंतर संबंधित कर्मचारी कामाच्या वेळी इतर ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर आयुक्त मुंढे यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या या ९ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. या सर्व कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, नागपूरमधील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आयुक्त मुंढे यांनी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला जबाबदारपणे काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कर्तव्यात कोणतीही कसूर आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. यानंतर मुंढेंनी कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धडक कारवाईस सुरुवात केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.