मुंबई, दि. ३० जुलै, २०२०: मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात गावी जाण्यासाठी बनावट प्रवासी पास बनवून देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई व मालवण पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य संशयित शहाबाद अलम अब्दुल सलाम (वय २१, रा. मूळ उत्तरप्रदेश) याला मालवण पोलिसांनी नालासोपारा पालघर येथून ताब्यात घेतले आहे. संशयित शहाबाद याची करोना टेस्ट करून त्याला मालवण येथे आणण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.
मुंबई क्राईम ब्रँच व सिंधुदुर्ग पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बनावट पास प्रकरणी हडी मालवण येथून तिघांना ताब्यात घेतले होते. तर बनावट पास प्रकरणी दुसऱ्या प्रकरणात मालवण पोलीसांनी सर्फराज हसन शेख याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात शहाबाद यांने बनावट पास बनवून दिल्याचे समोर आले. त्यानंतर मालवण पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या पथकाने शहाबाद याला ताब्यात घेतले. त्याचे नालासोपारा येथे पॅनकार्ड काढून देणे व अन्य स्टेशनरी दुकान आहे. त्याचा लॅपटॉप व मोबाइल जप्त करण्यात आला आहे. शाहबाद यांने सर्फराज याला तीन बनावट पास दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सरफराज यांची पोलीस कोठडी मुदत संपल्यानंतर त्याची न्यायलाईन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर मुंबई येथून ताब्यात घेतलेली शहाबद यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असून उद्द्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सरफराज यांची पोलीस कोठडी मुदत संपल्यानंतर त्याची न्यायलाईन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर मुंबई येथून ताब्यात घेतलेली शहाबद यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असून उद्द्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा