बिबट्याच्या हल्ल्यात ९ बकरी ठार १० गंभीर जखमी तर ४४ बकरी बेपत्ता राशिवडे येथील घटना
यशवंत सेना जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे यांची तात्काळ घटनास्थळी भेट
राशिवडे दि. १० जून, २०२० : करोना महामारी जिल्हाबंदीमुळे हैराण झालेल्या मेंढपाळ विलास शिवाजी जोंग रा. राशिवडे ता. राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांच्या मेंढरांच्या कळपावर आज दिनांक १० जुन, २०२० रोजी पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याच्या हल्ल्यात ९ मेंढ्या ठार १० जखमी ४४ बेपत्ता, घटनेची माहिती मिळताच संजय वाघमोडे यशवंत सेना, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर तातडीने घटनास्थळी धाव घेऊन डॉ. पठाणे उपसंचालक पशुसंवर्धन कोल्हापूर यांना व राधानगरी वनविभागाचे आर एफ ओ बिराजदार यांना फोनवरून कल्पना देऊन वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असुन ताबडतोब वन्य प्राणी यांचा बंदोबस्त करावा. तसेच पंचनामा करताना वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी हल्ला ज्या बकऱ्यावर झाला त्याचे अवशेष पाहिल्याशिवाय पंचनाम्यात घेत नाहीत.
काही वेळा वन्यप्राणी कळपाने येऊन हल्ला चढवतात व काही बकऱ्यांना सोबत घेऊन लांब नेऊन त्यांचा फडशा पाडतात. तेव्हा हल्ला झालेल्या बकऱ्यांचे अवशेष मिळत नाहीत. त्यामुळे मेंढपाळ यांना नुकसान भरपाई कमी मिळते. तरी बेपत्ता बकऱ्यांचीही नुकसान भरपाई मिळावी नाहीतर वनकर्मचाऱ्यानी ती शोधून काढून मेंढपाळ यांना द्यावी अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली. यावेळी घटनास्थळी सरपंच, तलाठी, मंडलविस्तार अधिकारी, पशुसंवर्धन विस्तारधिकारी, वनाधिकारी व वनकर्मचारी, अरुण फोंडे, यशवंत सेना भुदरगड तालुका.अध्यक्ष दत्ता जोंग, अध्यक्ष धनगर समाज राशिवडे आण्णा जोंग, रामचंद्र जोंग, सर्जेराव जोंग, काशिनाथ जोंग आणि धनगर समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत