प्रविण काकडेंना विधान परिषदेवर संधी मिळावी- आँल इंडिया धनगर समाज महासंघ शिरोळ तालुका पदाधिकारी यांची मागणी
शिरोळ, दि. १८ जून, २०२०: महाराष्ट्रात आगामी काळात राज्यपाल विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी धनगर समाजाचे नेते आँल इंडिया धनगर समाजाचे नेते प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांना विधानपरिषदेवर घ्या अशी मागणी आँल इंडिया धनगर समाज शिरोळ तालुका पदाधिकारी यांच्याकडुन ह़ोत
आहे. भारतातील अशी एक शाखा आहे की, यामध्ये कोणतीही शाखा पोटशाखा न मानता सर्व धनगराना एकाच झेंड्याखाली आणण्याचे कार्य गेले अनेक वर्ष सुरू आहे. काकडे यांनी अनेक गोरगरिब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. काकडे हे एक उच्च शिक्षित व सुस्वभावी व्यक्तीमत्व आहे एवढेच नव्हे तर आपले कुटुंब साभाळुन वेळप्रसंगी स्वखर्चाने संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन धनगर बांधवांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना संधी द्यावी अशी मागणी तालुकाध्यक्ष नेमिनाथ पुजारी, तालुका उपाध्यक्ष अजय हराळे, राजेंद्र निर्मळ, किशोर सलगरे, स्वप्निल लाटे, दत्तात्रय पुजारी, प्रकाश शेळके, राहुल बिरोजे त्याचबरोबर इतर सर्व पदाधिकारी यांच्याकडुन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत