पडळकर ही धनगर समाजाची नाही, तर आरएसएसवाल्याची औलाद – पाटील

सोलापूर, दि. २५ जून, २०२० : गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे आहेत की नाही हा प्रश्न आहे, धनगर समाजातील कोणताही व्यक्ती बिरोबाची शपथ गेऊन खोट बोलत नाही. सांगली लोकसभा निवडणुकीवेळी बिरोबाची शपथ घेत ‘एकवेळ माझा बाप भाजपमध्ये गेला, तरी मी भाजपमध्ये जाणार नाही’ असं पडळकरने सांगितल होत. विधानसभा निवडणुकीवेळी मात्र लगेच भाजपकडून अजित दादांच्या विरोधात निवडणूक लढवली. पडळकर ही धनगर समाजाची नाही तर कुठल्यातरी आरएसएसवाल्याची औलाद आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्यावर बोलण्याचे धाडस करू नये, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे, अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, पडळकर यांनी अनेक चुकीचे आरोप पवार साहेबांवर केले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात धनगर समाजाला स्थान देणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकमेव आहे. पडळकर आणि आरएसएसचा कॅन्सर राज्याला लागला आहे. त्यांच्या टीकेमुळे पवार उंची कमी होणार नाही. देवेंद्र फडणवीससुद्धा शरद पवार यांच्याविषयी बोलताना दहा वेळा विचार करतात, असं उत्तर उमेश पाटील यांनी पडळकर यांना दिल आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. पडळकरांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे का? हे आधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं अन्यथा पडळकरांचे पुढचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा काकडे यांनी दिला.

दुसरीकडे भाजपने मात्र पडळकर यांचे विधान वक्तीगत आहे. भाजपने पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत, या प्रकरणातून हात झटकले आहेत. ‘पडळकर यांनी शरद पवारांविषयी मांडलेल्या भूमिकेबाबत भाजप असहमत नाही, पण त्यांनी जो शब्दप्रयोग वापरला, तो १०० टक्के चूक आहे. भाजप या शब्दप्रयोगाशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांच्या राजकीय धोरणाबाबत आमचे मतभेद आहेत. आम्ही त्यांच्यावर टीका केली आणि यापुढेही करू, पण सार्वजनिक जीवनात असताना, कोणावरही अशी टीका करणं ही भाजपची परंपरा नाही,’ असं भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

साभार : https://maharashtradesha.com/gopichand-padalkar-is-child-of-rss/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.