नवी मुंबईतील ‘त्या’ ४४ झोनमध्ये पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन!
नवी मुंबई, दि. २६ जून, २०२०: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नवी मुंबई आणि परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नवी मुंबई शहरामध्ये २९ जून पासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार असून ७ दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये ७ दिवसांचा लॉकडाऊन असेल. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलिसांची बैठक घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात घरोघरी मास्क स्क्रिनिंग होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर नवी मुंबईत मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वेगाने वाढू लागल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत आणि जवळच्या ठाण्यात देखील पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत