धनगर आरक्षण आरपारची लढाई

महाराष्ट्र टुडे, २१ , जुलै २०१९, कोल्‍हापूर : धनगर समाजाच्‍या आरक्षणाबाबत भाजप सरकारने फसवणूक केली आहे. आरक्षणासाठी समाजातर्फे आरपारची लढाई सुरु करण्‍यात येणार आहे. २८ जुलैला कोल्‍हापुरात गोलमेज परिषद आणि ११ ऑगस्‍टला पंढरपुरात राज्‍यव्‍यापी मेळावा घेणार असल्याची घोषणा महाराष्‍ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्‍यक्ष आमदार रामहरी रुपनवर आणि धनगर समाजाचे ज्‍येष्‍ठ नेते माजी मंत्री अण्‍णा डांगे यांनी पत्रकार परिषदेत कोल्हापुरात रविवारी केली.

मेळाव्‍यास राज्‍यातून सुमारे दोन ते अडीच लाख समाजबांधव उपस्‍थित राहतील, असे सांगून डांगे म्‍हणाले, भाजपने२०१४ मध्‍ये सत्तेत येताच प्रथम धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्‍याचे आश्‍वासन दिले. ते आजतागायत पाळले नाही. २०१४ पासून या समाजास खेळवत ठेवण्‍याचे काम केले आहे. इतर समाजाचे आरक्षण हाेते मग धनगरांचे का नाही? त्‍यामुळे आता आरपारचीड लढाईचा निर्धार केला आहे. या मेळाव्‍यास राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार, काँग्रेसच्‍या प्रियंका गांधी, यांच्‍या सह राज्‍यातील सर्व विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांना निमंत्रित केले जाणार आहे.

आ. रुपनवर म्‍हणाले, राज्‍य घटनेने धनगरांना आरक्षण दिले आहे. मात्र त्‍याचा लाभ मिळत नाही. केंद्रात ओबीसी, राज्‍यात एनटी आणि घटनेत एसटी अशा तीनप्रवर्गातआरक्षण मिळूनही एकाही प्रवर्गात लाभ होत नाही. त्‍यामुळे घटनेने दिलेले अनुसुचित जमातीचे आरक्षण द्यावे. यासाठी राज्‍य शासनाने केंद्र सरकारल एक शिफारस करायची आहे. ही शिफारसही सरकार करीत नाही. ही शोकांतिका असल्याची खंत उपस्थित केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.