आता धनगर समाज पवार साहेबांना जागा दाखवेल, शरद पवार यांच्या विधानावरून धनगर नेते आक्रमक

महाराष्ट्र देशा, ०२, मार्च २०१९  : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी करमाळा येथे धनगर आरक्षणा संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून धनगर नेते आक्रमक झाल्याच पहायला मिळत आहे. आजवर पवार साहेबांच्या जे पोटात होत ते ओठावर आलं आहे, आजवर त्यांची भूमिका धनगर समाजाच्या बाबतीत अशीच उदासीन राहिली असल्याची टीका धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीमध्ये बोलताना शरद पवार यांनी फडणवीस सरकारचा समाचार घेतानाचं धनगर समाज मते दुसऱ्याला देतो आणि प्रश्न मला सोडवायला सांगत असल्याचं म्हंटल होत. पवार यांच्या याच विधानावरून धनगर समाजातील नेत्यांकडून टीका केली जात आहे.

पवार साहेबांच्या राजकारणात धनगर समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जिथे जिथे राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत आहे तिथं तिथं धनगर समाजाने पहिल्यापासून त्यांना आधार दिलाय . मात्र, आता धनगर समाज सुज्ञ झाला आहे त्यामुळे लोक आता त्यांना कृतीतूनच त्यांची जागा दाखवतील. शरद पवारांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूने नाहीये, जेव्हा आम्ही एस.टी आरक्षणाची मागणी केली होती, तेव्हा त्यांनी जाणून बुजून एन.टीचा घाट घातला. त्यामुळे शरद पवार हे आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक असणार नाहीतच हे काल लोकांना स्पष्ट झाल्याचं धनगर नेते गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

धनगर आरक्षणा विषयी नेमक काय म्हणाले होते शरद पवार

आत्ताच बंडगर ( स्थानिक नेते ) यांनी या ठिकाणी भाषण केले. यावेळी त्यांनी मलाच सांगितले की, तुम्ही आमचा प्रश्न सोडवा. मी बंडगरांना धन्यवाद देतो की, मत तिकडे देता आणि प्रश्न आम्हाला सोडवायला सांगता. हे वागणं बर हायका.. तुम्ही मत द्या यातून मार्ग काढू, मार्ग याच्या आधी देखील काढले आहेत. आमची सत्ता असताना केंद्रामध्ये कायदा बदलून घेणे अवघड होते. त्यामुळे तात्पुरती मदत केली पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्रात नवीन कायदा केला. धनगर समाजाच्या मुलांना मेडिकल, इंजिनिअरिंगला जायचे असेल तर आरक्षण ठेवले. त्यामुळे अनेक मुले आज डॉक्टर झाली आहेत. शंभर टक्के प्रश्न सुटला नाही हे आम्ही मान्य करतो. ”. यावेळी बोलताना पवार यांनी २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने साथ सोडल्याची खंत व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.