धनगर समाजावर महाराष्ट्र सरकारचा अन्याय!

मुंबई : धनगर समाज ६० वर्षांपासून (एस. टी.) आरक्षणापासून वंचित राहिला आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील राजकारणी आता पर्यंत घेत आले आहेत. समाजातील पूर्वीचा समाज बांधव अशिक्षित असल्यामुळे (एस. टी.) आरक्षणाचे महत्त्व समजले नाही. ह्या कारणाने बांधव राजकीय, शैक्षणिक अनेक गोष्टीत काहीप्रमाणात पाठीमागे राहिला. आताची तरुण पिढी जागृत झाली असून गेल्या पाच वर्षात २०१४ पासून समाजातील तरुण तडफदार बांधवानी आरक्षणाच्या बाबतीत वादळ उठवले आहे. परंतु पाच वर्षात समाजाने महाराष्ट्रात अनेक मोर्चे काढले, उपोषणे केली, समाज जागृतीसाठी केडरकॅम्पहि घेतले, त्याचबरोबर माजी आयपीएस अधिकारी मधू शिंदे यांच्या टीमच्या माध्यमातून आरक्षणासाठी कोर्टामध्ये याचिका हि दाखल केली आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या मार्गाने समाजबांधव आरक्षणासाठी झटत आहे. तरी महाराष्ट्र सरकार नमते घेत नाही. समाजातील अनेक नेते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत त्यांनाहि यश येत नाही. पण चार ते पाच महिन्यापासून तरुणांचे ताईत झालेले तरुण तडफदार गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील गाव, तालुका, जिल्हा पातळीवर जाऊन समाजातील तरुणांना आरक्षणाच्या बाबतीत कश्याप्रकारे नियोजन केले पाहिजे व तरुणांनी शिक्षण घेऊन शासनाच्या वेगवेगळया उच्चस्तरीय पदावर विराजमान होऊन समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे हे मार्गदर्शन दिले आहे. 


परंतु गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखेरचा लढा महाड (चवदार तळे) ते आझाद मैदान, २७ फेब्रुवारी ते १ मार्च असा लाँग मार्च काढला होता. त्या मोर्च्याची २७ फेब्रुवारीला सुरुवात हि झाली, जस जसा मोर्चा पनवेल पर्यंत येऊ लागला तसा सरकारच्या माध्यमातून धनगर सजातील नेते मंडळींना अटक करून मोर्चा चिघळण्याचा प्रयन्त करण्यात आला. पण सरकारला मोर्च्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले आणि अटक केलेल्या नेत्यांना सोडण्यात आले. हा मोर्च्या जसजसा पुढे सानपाडा येथील दत्त मंदिरात येऊन थांबला. परंतु २८ फेब्रुवारीचा दिवस उजाडला तसा सरकारच्या आदेशावरून हा मोर्चा पुढे येण्यास रोखले. विधिमंडळाचा अर्थसंकल्प अधिवेशन चालू असल्याने धनगर समाजातील मान्यवर नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी मिटिंगला बोलवून चर्चा केली. त्याच        जम्मू काश्मीर येथील १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे घडलेल्या घटनेला अनुसरून राज्यातील अनेक कार्यक्रम रद्द करण्याची हाक दिली आहे. सरकारचे लोकप्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांना पाठवून मोर्चा रद्द करण्यास सांगितले. मोर्च्याच्या वेळेस समाजाला पाटील यांनी धनगड हि जातच महाराष्ट्रात नाही असेही बोलले.
पुलवामा येथे अतिरेकीच्या हल्यात शहीद झालेल्या जवानांमुळे धनगर समाज बांधवांनी मोर्चा रद्द केला. त्याचे कारण मुंबईमध्ये हाय अलर्ट जरी केला आहे व तो पोलिसांवर जास्त भार पडत आहे असे हि लोकप्रतिनिधी यावेळी सांगितले. आजच्या घडीला १ मार्च रोजीही मुंबईमध्ये अनेक मोठमोठे कार्यक्रम केले जात आहेत, त्यापैकी बांद्रा येथील काँग्रेसच्या सभेला संबोधण्यासाठी राहुल गांधी हजर झाले आहेत. तेव्हा कुठे गेला तुमचा मुंबई पोलिसांवरील ताण किंवा हाय अलर्ट असा प्रश्न धनगर समाजाला पडला आहे. धनगर आणि सरकार ह्यामध्ये गेली साठ वर्षे वैर आहे असे समाजाला वाटत आहे. कारण ह्या समाजाला आरक्षण दिले तर महाराष्ट्रातील राजकीय राजवट मोडीस निघेल व ते सरकारमध्ये राज्य करतील असे त्यांना वाटते. पण हि वेळ आता आली आहे, धनगर समाजातील तरुण तडफदार तरुणवर्ग जागा झाला आहे, येणाऱ्या काळात नक्कीच सरकारला धडा शिकवला जाईल अशी समाजबांधवांची ईच्छा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.