धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही - पंकजा मुंडे

दैनिक लोकमत,07 जानेवारी 2019, नांदेड : 'जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळनार नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही' असं जाहीर वचन राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिलं आहे. नांडेद जिल्ह्यातील माळेगाव इथं सध्या खंडोबाची यात्रा सुरू आहे.  यावेळी आयोजीत धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या परिषदेला रासप पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांचीदेखील उपस्थीती होती. 'मी पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला वचन देते, तुमच्या आरक्षणाचा विषय होईपर्यंत मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'आम्ही पुन्हा सत्ता काबीज करणार आहोत, पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकत नाही' याचा विश्वास असल्याचे म्हणत 'धनगर आरक्षणाच्या निर्णयाशिवाय पुन्हा भाजपाची सत्ता येणार नसल्याचं' पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कबुल केलं.

धनगर आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेर येऊन तुमच्यासोबत मेंढरांमागे येण्याची तयारी असल्याचा विश्वासही पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिला.

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा
मराठा आरक्षण दिल्यानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत धनगर आरक्षणाचा मुद्दादेखील मार्गी लावणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती.

पंतप्रधान मोदी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षण देण्यासाठी सरकार दरबारी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.