महेश्वरच्या किल्लाची माहिती
महेश्वर् हे म.प्र्.तील खरगोन जिल्यातील इन्दुरहुन अदमासे ९१ कि.मी वर
नर्मदा नदिच्या काठावरिल एक रम्य ठिकाण आहे.महेश्वर हे खूप रम्य स्थळ
आहे.‘पुण्यश्लोक राणी अहिल्येच्या गावात
आपले स्वागत असो’. गावाची वेस ओलांडता ओलांडताच लक्षात येते की, गावावर
अजूनही राणीचे राज्य आहे आणि ती राणी ‘पुण्यश्लोक’ आहे. आजही महेश्वरी राणी
ची राजगादी पाहावी आणि इहलोकीच्या सगळ्या दु:खापार अहिल्यादेवीच्या
कर्तृत्वाचा पसारा जाणवून थक्क होऊन जावे.चौसोपी पुराणकालीन वाडा.
काळ्या
शिसवी रंगाचा. अपार शांतीचा. चौकात मधोमध तुळशी वृंदावन. वाडय़ाला एखाद
मजल्याचा डोलारा. वाडय़ाची वेस ओलांडून आत यावे तर डावीकडे अहिल्यादेवीने
जिथून न्याय-निवाडा केला, राजकारण पाहिले, ती राजगादी मांडून ठेवलेली.
वास्तूभोवती इतके अपार साधेपण की कुठे हंडय़ा-झुंबऱ्यांचा सोस नाही.कारंजांची
आतषबाजी नाही की दौलतीची अतिरंजित मांडणी नाही. महेश्वरचा घाट यासोबत
अहिल्यादेवी होळकरांची कचेरी पहायला
मिळते.नर्मदेतील गोटा या ठिकाणी
पात्रात व्यवस्थित दिसतो. अशाच सुंदर गोट्यांचे शाळिग्राम (होळकरांचे
कलेक्शन) एका मंदिरात आहेत. चकचकीत विविध आकाराचे आणि रंगांचे गोटे एकत्रित
पहायला छान वाटले.होळकर हे संस्थान खालसा झाले. (असे वाटते) त्यामुळे
राजघराण्याची विशेष शानशौकत नाही. याशिवाय सध्याचे होळकरवंशज आंग्ल
(विवाहामुळे) झाल्यासारखे आहेत. या किल्याची थोडीफार दखल ते घेतात. याच
भागातील हातमागाचे कारखाने आहेत. इथली महेश्वरी साडी प्रसिद्ध आहे. येथे
मध्यप्रदेश टुरिजम ने राहण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे. त्या अतिशय
धार्मीक व्रुत्तीच्या होत्या त्याची झलक त्यांच्या वाड्यात असलेल्या
पुजेच्या साहित्य बघुन होते. त्यांनी वास्तव केलेल्या वाड्यात त्यांच्या
वापरातील वस्तु सुबक रितीने आजही पहावयास मीळतात.भारतात ठिकठिकाणी त्यांनी
बांधलेल्या धर्मशाळा व घाट याची ग्वाही देतात. त्यामुळेच त्यांना
पुण्यश्लोक राजमाता देवी असे नामाभिमान प्राप्त झाले..वाडय़ाच्या मागच्या
अंगाला पारंब्या नसलेल्या वडाखालच्या खोलीत अहिल्यादेवीचे देव हारीने
मांडून ठेवलेले दाखविले जातात. ‘या वडाला पारंब्या नाहीत. केवळ दोन मुळं
एकमेकांत गुरफटून सर्पागत लपेटलेली आहेत,’ पुजारी सांगतो. दाखवतो,
अहिल्यादेवीच्या पूजेतली शंकराची पिंडी, कृष्णाचा पाळणा. हा खंडोबा, हा
अमुक, हा तमुक.. देवांची ओळख घडवली जाते. ज्या अपार श्रद्धेने
अहिल्यादेवीनी पूजा केली असेल तेच देव आज आपल्यासमोर मांडून ठेवले आहेत ही
जाणीवही नतमस्तक करते. नकळत हात जोडले जातात. श्रद्धेपार उरते साध्वी राणी
अहिल्या.. महेश्वरचा श्वास.. केवळ या वाडय़ावरच नाही तर एकूणच महेश्वर
गावावर वाडा संस्कृतीची झलक नजरेस पडते.महेश्वरी साडीचा एक अपूर्व ठसा
अहिल्यादेवी गावावर उमटवून गेल्या आहेत.किल्ल्यात महादेवाचे मंदिर. असंख्य
पायऱ्यांनी बांधून काढलेला घाट. घाटावर छत्र्यांची गर्दी. घाटावरली
मुक्ताबाईंची छत्री मोठी. त्यामानाने अहिल्यादेवीची छत्री साधी-सुधी.काही
शतकापूर्वी बांधलेला घाट आजच्या काळातही इथल्या लोकांचे पालनपोषण करतो
आहे.इंदुर् ह्या लहानशा खेड्याला भरभराटिस आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा
आहे. मात्र त्यांनी आपली राजधानी ही महेश्वर येथे स्थापीत केली. त्या
आपल्या प्रजेला आपल्या अपत्याप्रमाणे वागवत.येथील किल्ल्याचे आज एका
अद्ययावत हॉटेल मध्ये रुपांतर झाले आहे. नर्मदासरोवर धरणाने त्यातील
नर्मदेची पातळी वाढणार आहे (वाढली आहे.)त्यामुळे राजवाड्याला धोका निर्माण
झाला आहे. १७९५ मध्ये त्या निपुर्त्रिक वारल्यानंतर त्याच्या नंतर त्याचा
सेनापति असलेल्या तुकोजी होळकर हे १७९५ ला गादीवर बसवले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत