मी अहिल्या होणार ग …

मी अहिल्या होणार ग …हा चित्रपट दिनांक : १६-१२-२०११ , पासून शरद सिनेमागृह वेळ : १२ ते ०३, आणि ३ ते ६ चालू होत आहे तरी आपण हा चित्रपट जरुर पहावा …… जय अहिल्या जय मल्हार
अहिल्यामाई होळकरांचा आजच्या काळात आदर्श घेऊन राजकारण करणाऱ्या वैशाली बंडगर नामक तडफदार बहुजन समाजातील तरुणीचा रोमांचित करणारा प्रवास रेखाटणारा दिग्दर्शक महेश बनसोडे यांचा “मी अहिल्या होणार ग”हा बिग बजेट मराठी चित्रपट येत्या १८ नोहेंबर २०११ रोजी संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित होत आहे. प्रत्यक स्त्री-पुरुषाला एक सकारात्मक आणि स्पुर्तीदाई विचार देणारा हा चित्रपट मनोरंजनाच्या दुनियेत आपला विशेष मराठमोळा ठसा उमटविन्यास सज्ज झाला आहे.
चित्रपटात वैशाली बंडगर या तडफदार तरुणीची संघर्षाची राजकीय कथा मांडण्यात आली आहे.विटभट्टीवार काम करणाऱ्या गरीब कुठूबात जन्माला आलेली वैशाली बंडगर (वर्षा रुपनर) हिला शिक्षणासाठी तिची आई (वर्षा पवार),वडील (सुरेश म्हेत्रे) स्वतापासून दूर एका समाजसेवेला वाहून घेतलेले शिक्षक (बालाजी वाघमोडे )यांच्या बरोबर पाठवून देतात.ही मुलगी अहिल्यामाईची पुस्तके वाचून त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन लहानाची मोठी होते.शिक्षण संस्थेचे मालक, राजकारणी मल्हारराव देशमुख(प्रकाश गडदे) तिला आपली सून करून घेतात.तिचा नवरा संग्रामसिंग देशमुख (सिदार्थ शिंदे) याचा राजकारणातून त्यांचे विरोधक सत्यजित पाटील (स्वप्नील राजशेकर) हे खून करतात.मग ही विधवा वैशाली दुख करत नं बसता नवऱ्याच्या जागी राजकारणात येते. सासर्यांच्या मार्गदर्शनाखाली व अहिल्यामाईचा आदर्श घेऊन नितीमत्तेचे राजकारण करण्यास सुरवात करते,तिच्या विरूधात पालकमंत्री (रमेश येडगे) उभे राहतात.मग सतेज पाटील आणि पालक मंत्री मिळून तिच्या विरूधात राजकीय खेळी खेळूलागतात.अनेक अडचणीच्यावेळी प्रत्यक्षात अहिल्यामाई होळकर(सुरेखा कुडूची)यांचे प्रसंग डोळ्यापुढे उभाराहून तिला मार्ग सुचवतात.हे प्रसंग नक्की कोणते आहेत?हे प्रसंग वैशालीला काय सुचवतात?राजकीय खेळीतून ती बाहेर पडते का?तिचे सासरे तिला मदत करतात का?ती खुनाचा बदला घेते की नाही? यासाठी चित्रपट पाहणेच इस्ट . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,ततागत भगवान बुध,महात्मा फुले,सम्राट अशोक यांचा आदर्श घेऊन त्यांचा विचार आचरणात आणणारा कोणताही माणूस कधीच अपयशी होणार नाही.हा पक्का सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.निर्माते रमेश येडगे यांच्या ऋतुराज फिल्म प्रोडक्शनचा हा पहिला चित्रपट आहे.या चित्रपटाला अखिल भारतीय धनगर समाज इंदोर यांचे दोन पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आले आहेत. या चित्रपटासाठी लेखक- बालाजी वाघमोडे, गीतकार-रामदास नाईकनवरे,बालाजी वाघमोडे,रमेश येडगे,संगीतकार-संजय पाटील,कार्य्कारीनिर्माता-यासीन अल्ली.क्यामेरा-युजीन डिसोजा,एडिटर -आनंद मन्डावी, पोस्टप्रोडक्शन-आशीर्वाद क्रिएशन ,रसायन-रिलायन्स मीड्या वर्क,कला-संदीप डांगे,रंगभूषा,वेशभूषा,केशभूषा-माधुरी कुंभार,अमृता कुंभार,कलाकार-वर्षा रुपनर,सिदार्थ शिंदे,रमेश येडगे,बालगी वाघमोडे,प्रकाश गडदे,सुरेखा कुडूची,स्वप्नील राजशेखर,माधुरी,अमृता,अंकुश देशमुख,बालकलाकार- श्रुष्टी,राज येडगे,नृत्यदिग्दर्शक , दिग्दर्शक-महेश बनसोडे यांनी काम पहिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.