धनगर समाजाच्या आरक्षणात आघाडीचा अडथळा – शेंडगे
पुण्यनगरी , बुधवार, १२ फेब्रुवारी २०१४
सांगलीतून लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे प्रतिपादन?
नांदेड : धनगर समाजाला आरक्षण मिळण्यात सत्ताधारी लोकशाही आघाडीचा मोठा अडथळा असल्याचा आरोप भाजपा आमदार व धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. मुखेड येथे आयोजित धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्यानिमित्त आ. शेंडगे आले असता त्यांनी सेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. आपण सांगलीतून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचेही या वेळी त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, धनगर, हटकर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून कोसोदूर आहे. केवळ धनगड, धनगर या शब्दामुळे उच्चाराच्या गफलतीमुळे व केवळ शासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे धनगर समाज संविधानानुसार अनुसूचित जमातीमध्ये आहे; परंतु त्या सवलती लागू केल्या जात नाहीत. या किरकोळ चुकीमुळे अतिमागास असलेल्या समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या आरक्षणासाठी समाजाने अनेक वेळा आंदोलने केली, हिवाळी अधिवेशनावर नागपूरमध्ये भव्य मोर्चा नेण्यात आला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला अपमानास्पद वागणूक दिली. काँग्रेस व राष्ट्रवादी जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणे अशक्य आहे, असे सांगत शेंडगे म्हणाले की, काँग्रेसची राजवट संपविणे समाजाच्या हिताचे असून एसटी प्रवर्गात समाजाचा समावेश झाला तर धनगर, हटकर समाजाचे मोठे हित साधले जाणार आहे. मुखेड मतदारसंघात धनगर, हटकर समाज मोठय़ा संख्येने असल्यामुळे सत्ताधारी घाबरत आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नारायण राणे समिती गठीत केली जाते; परंतु धनगर समाजासाठी कोणतीही समिती स्थापन केली जात नाही, असा आरोप करीत ते म्हणाले की, धनगर समाज महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा असून आता तर महादेव जानकरही महायुतीत आल्याने त्याचा फायदाच होणार आहे. नांदेड लोकसभा व मुखेड विधानसभेसाठी सक्षम उमेदवार दिला जाईल. आपण सांगलीतून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे शेंडगे म्हणाले.
http://www.dhangarraja.com/?p=1361

कोणत्याही टिप्पण्या नाहीत